प्रादेशिक बातम्या

January 6, 2026 6:02 PM

views 66

TMC Election : भाजपाचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपानं ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठीचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. या महापालिका निवडणुकीत किमान १०० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपानं केला आहे. ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधणं, नागरिकांना २४ तास पाणी पुरवणं आणि जुन्या, गळणाऱ्या पाइपलाइनसाठी विशेष निधीचं आश्वासन यात असल्य...

January 6, 2026 3:26 PM

views 16

पश्चिम रेल्वे १८ डब्यांच्या उपनगरी गाड्यांची चाचणी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करणार

१८ डब्यांच्या उपनगरी गाड्यांची चाचणी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मध्यात करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत बहुतेक गाड्या या १२ डब्यांच्या आहेत, तर मध्य आणि पश्चिम मार्गावर १५ डब्यांच्या गाड्याही धावतात. आता विरार ते डहाणू या टप्प्यात १८ डब्यांच्या दोन उप...

January 6, 2026 2:55 PM

views 20

CRS सॉफ्टवेअर नोंदणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती

सी आर एस अर्थात नागरी नोंदणी प्रणाली सॉफ्टवेअर नोंदणीत अनियमितता आढळल्याप्रकरणी राज्य सरकारने एका विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. तेराशे लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेंदूरसनी या  गावात जन्म आणि मृत्यूच्या २७ हजार नोंदी आढळल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं, या प्रकरणी हा तपास केला जाईल. ...

January 6, 2026 2:57 PM

views 145

दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

राज्यभरात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पत्रकारिता महाविद्यालयांसह विविध संस्था संघटना विविध कार्यक्रम आयोजित करत दर्पण दिन साजरा करत आहेत, तसंच बाळशास्त्री...

January 6, 2026 1:40 PM

views 20

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या गॅस गळतीनंतर ONGC च्या तज्ज्ञांचं पथक मुंबई आणि दिल्ली इथून रवाना

आंध्रप्रदेशमध्ये कोनासीमा जिल्ह्यात ONGC च्या तेल विहिरीतून  झालेल्या गॅस गळतीनंतर लागलेली आग विझवण्यासाठी आज ONGC  च्या तज्ज्ञांचं पथक मुंबई आणि दिल्ली इथून रवाना झालं. मोरी आणि इरुसुमांडा या गावांजवळच्या या तेल विहिरीतून काल गॅस गळती झाली. त्यानंतर  जवळजवळ २० मीटर उंच आणि २५ मीटर रुंदीचा आगीचा झोत...

January 6, 2026 1:30 PM

views 61

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निवडणुकी संदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल असून त्यावरची सुनावणी होईपर्यंत निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. क्रिकेटपटू केदार जाधव, तसंच सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि इतक काही याचिकाकर्त्यांनी विविध म...

January 6, 2026 1:19 PM

views 159

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री  सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंतिम संस्कार करणात येणार आहेत.  कलमाडी यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी आज  निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. निवृत्तीनंतर ...

January 5, 2026 8:15 PM

views 36

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेची न्यायालयात धाव

महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये ६८ ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्ह...

January 5, 2026 6:52 PM

views 29

एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बस वर्षअखेरपर्यंत दाखल करण्याच्या सूचना

एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस या वर्षअखेरपर्यंत दाखल करा, त्यासाठी सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करा, अशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते एसटी महामंडळाच्या सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पीय निध...

January 5, 2026 6:31 PM

views 19

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचं प्रादेशिक परिवहन कार्यालयातलं कोणतंही नियमित कामकाज होणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित सेवांच्या पर्यायी तारखांना आपली कामं पुनर्नियो...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.