राष्ट्रीय

July 31, 2024 1:33 PM July 31, 2024 1:33 PM

views 7

भारतीय माहिती सेवेतले माजी अधिकारी सुरेश चंद्र शर्मा यांचं आज नवी दिल्ली इथं निधन

भारतीय माहिती सेवेतले माजी अधिकारी सुरेश चंद्र शर्मा यांचं आज नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अनेक विभागांमध्ये त्यांनी काम केलं. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाच्या सहसंचालक पदावरून ते २०००मध्ये निवृत्त झाले होते.

July 31, 2024 1:15 PM July 31, 2024 1:15 PM

views 11

बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात असल्याची रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत ग्वाही

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला. बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात ...

July 31, 2024 11:23 AM July 31, 2024 11:23 AM

views 18

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रा...

July 31, 2024 10:12 AM July 31, 2024 10:12 AM

views 9

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते नॅटस् 2.0 पोर्टलचे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय परीविक्षा आणि प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नॅटस् 2.0 पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच शिकाऊ उमेदवारांसाठी 100 कोटी रुपयांचा भत्ता थेट खात्यात हस्तांतरीत करण्यात आला. हे प्रशिक्षणार्थी, मा...

July 31, 2024 10:03 AM July 31, 2024 10:03 AM

views 31

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते...

July 30, 2024 8:45 PM July 30, 2024 8:45 PM

views 8

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा असं यात म्हटलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतल्या कोंचिं...

July 30, 2024 8:37 PM July 30, 2024 8:37 PM

views 33

येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद

देशातल्या सर्व राज्यांच्या राज्यपालांची परिषद येत्या २ आणि ३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नुकतेच लागू झालेल्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र तसंच आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यातल्या ...

July 30, 2024 8:27 PM July 30, 2024 8:27 PM

views 7

सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारली – प्रफुल्ल पटेल

राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावरची चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी २०१४ पासून सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचं प्रतिपादन केलं. गेल्या दहा वर्षांत देशात रस्ते, पूल, विमानतळ, बंदरं आणि नूतनीकरणक्षम उर्जा यांचं जाळं निर्माण झाल्याचं त्यांनी सा...

July 30, 2024 8:53 PM July 30, 2024 8:53 PM

views 12

साडेचार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सरकार साडे चार टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. भारत ही कोविडनंतर वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्या म्हणाल्या. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ...

July 30, 2024 8:39 PM July 30, 2024 8:39 PM

views 9

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.