राष्ट्रीय

August 19, 2024 1:26 PM

views 24

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात प्रधानमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं अशी ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांची विनंती

कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावं, अशी विनंती करणारं पत्र देशातल्या ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी लिहलं आहे. अशा हिंसक कृती वैद्यकीय व्यवसायाचा पाया हादरवणाऱ्या असून महिला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांविरोधात होणाऱ्या...

August 19, 2024 11:01 AM

views 23

चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. प्रादेशिक सागरी प्रतिसाद केंद्र तेल गळतीच्या प्रतिसादासाठी एकात्मिक दृष्टीकोन सुनिश्चित करून या भागातील देशांमध्ये समन्वय सुलभ करेल. ...

August 19, 2024 12:25 PM

views 19

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं काल चेन्नई इथं हृदयविकारानं निधन झालं. ते एकोणसाठ वर्षांचे होते. तटरक्षक दलाच्या सागरी प्रतिसाद केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते चेन्नई इथं गेले होते. ३४ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांनी तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्...

August 19, 2024 11:14 AM

views 20

पश्चिमबंगाल, ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, छत्तीसगड आणि दक्षिण द्वीपकल्प परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद...

August 19, 2024 1:39 PM

views 23

नौदल संबंध मजबूत करण्यासाठी आयएनएस तबर डेन्मार्कमध्ये दाखल

भारतीय नौदलाची INS तबर ही प्रमुख युद्धनौका दोन दिवसांच्या भेटीसाठी डेन्मार्कच्या एस्जबर्ग येथे दाखल झाली आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्या नौदलांदरम्यान असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा आयएनएस तबरच्या या भेटीचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. INS तबर बंदरात असताना या नौकेवरील कर्मचा...

August 19, 2024 10:43 AM

views 37

भारत आणि कुवेत यांच्यातील भागीदारी सातत्याने वाढ- परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी काल कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालेद अल-सबाह अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांची काल भेट घेतली. भारत आणि कुवेत यांच्यात सद्भावना आणि मैत्रीचे अनेक शतकांपासूनचे संबंध असून दोन्ही देशांमधील भागीदारीत सातत्याने वाढ होत आहे, असं डॉक्टर जयशंकर यांनी समाज माध्यमावर...

August 18, 2024 8:40 PM

views 27

उत्तर प्रदेशात बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० कामगारांचा मृत्यू, ३७ जण जखमी

उत्तर प्रदेशात, बुलंदशहर जिल्ह्यातल्या सालेमपूर भागात एक बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले. अपघातग्रस्त पिकअपमधले कामगार गाझियाबादहून रक्षाबंधनाच्या सणासाठी अलीगड जिल्ह्यातल्या रायपूर या गावी निघाले होते.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे, तर चार गंभीर जखमी...

August 18, 2024 8:31 PM

views 27

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना या कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहा यांनी काँग्रेसवर टीका ...

August 18, 2024 7:00 PM

views 26

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतल...

August 18, 2024 6:58 PM

views 23

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षेसंबंधीचे नियम विमानतळांवरच्या नियमांइतके कडक करावेत, स...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.