राष्ट्रीय

February 23, 2025 1:26 PM

views 23

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली

समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या कामामुळे समाजात सकारात्मक बदल झाला, असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाल्या.

February 23, 2025 1:37 PM

views 27

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर

भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य बळकट करायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.  लष्करप्रमुख उद्या पॅरिसमधल्या लेस इनव्हॅलिडेस इथं फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियरे यांच्याशी चर्चा करतील, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. द...

February 23, 2025 10:01 AM

views 33

आरोग्यसेवा हा मूलभूत अधिकार – मंत्री डॉ. एस जयशंकर

आरोग्यसेवा हा विशेषाधिकार नसून मूलभूत अधिकार आहे असं मत परराष्ट्र मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत 12 व्या आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद कार्यक्रमात बोलत होते. आयुष्मान भारत आरोग्य विम्यासारखे उपक्रम करोडो नागरिकांपर्यंत पोहोचल्याचं सांगत जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य सुव...

February 23, 2025 9:57 AM

views 8

TB Campaign : १० कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी, ५ लाखांहून अधिक बाधित रुग्ण

केंद्रीय आरोग्य आणिकुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100-दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेत संपूर्ण देशभरात 10 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 लाखांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेत 455 जिल्ह्यांमध्ये तीन लाख 57 हजार क्षयरुग्णांचं निदान झालं आहे. या मोहिमेत 10 लाख शिबिरांचं...

February 23, 2025 1:35 PM

views 11

प्रधानमंत्री आजपासून पुढील तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून पुढचे तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आज दुपारी मध्यप्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे. या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रं आणि निष्ण...

February 23, 2025 1:01 PM

views 27

प्रधानमंत्री आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, NEWS ON AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲप वर देखील हा कार्यक्रम प...

February 23, 2025 10:06 AM

views 22

महाकुंभमध्ये ६० कोटी ७४ लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 60 कोटी 74 लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. या भव्य मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यां...

February 22, 2025 8:14 PM

views 24

शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा -शिवराज सिंह चौहान

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पुसा-कृषी विज्ञान मेळ्याचं उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शक...

February 22, 2025 8:13 PM

views 32

शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे दुसरे प्रधान सचिव असतील. त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती. दास हे तामिळनाडू कॅ...

February 22, 2025 8:28 PM

views 34

सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शाह यांनी आज पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना स्वीकृती पत्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.