राष्ट्रीय

December 26, 2025 3:24 PM

views 39

प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संवाद साधला

संपूर्ण देश आज साहेबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.   यावेळी त्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संव...

December 26, 2025 3:05 PM

views 8

थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद उधम सिंह यांच्या १२६व्या जयंतिनिमित्त आदरांजली

थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद उधम सिंह यांच्या १२६व्या जयंतिनिमित्त आज देश त्यांचं स्मरण करत आहे. फाळणीपूर्व भारतातल्या पंजाबमध्ये सुनाम या गावात १८९९मध्ये सिंह यांचा जन्म झाला होता. जालियनवाला बागेत जमलेल्या देशबांधवांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या मायकल ओडवायर या ब्रिटीश अधिकाऱ्याची त्यांनी हत्या ...

December 26, 2025 2:57 PM

views 19

 दिल्लीतील एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करण्याची याचिका

   दिल्लीत हवेचा दर्जा  ढासळत असल्यामुळे  एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं  केंद्र सरकारकडून जबाब मागितला आहे. एअर प्युरिफायरवर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र हे उपकरण गरजेचं झालं असून,  वैद्यकीय उपकरण गणलं जावं आणि त्यावरचा जीएसटी पाच...

December 26, 2025 2:53 PM

views 12

भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकासकामं राबवण्यात येणार – कृषीमंत्री

२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकासकामं राबवण्यात येतील असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आहे.   दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगितलं की जीरामजी योजनेत सव्वाशे दिवस काम पुरवण्याची तरतू...

December 26, 2025 1:30 PM

views 62

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी आज नवी दिल्ली इथं 'वीर बाल दिना'निमित्त प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण केलं. या वर्षी १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतल्या मिळून २० मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, पुरस्कार विज...

December 26, 2025 1:29 PM

views 31

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवन सुलभ करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगाने होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, सरत्या वर्षात आपल्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आला.   या सुधार...

December 26, 2025 1:26 PM

views 32

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला आज प्रारंभ

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची बैठक आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली सुरु होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला प्रधानमंत्री  उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबू...

December 26, 2025 10:39 AM

views 30

जुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून पुन्हा नव्याने अटक

राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या जुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने काल पुन्हा नव्याने अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या पुण्याच्या विशेष न्यायालयाने त्याला 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आ...

December 26, 2025 10:24 AM

views 10

बांगलादेशातील हंगामी सरकार गैर-मुसलमान नागरिकांवर अत्याचारा करत असल्याचा आरोप

बांग्लादेशात मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकार देशातल्या गैर-मुसलमान नागरिकांवर अकल्पित अत्याचार करत असल्याचे बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीररित्या सत्ता बळकावलेला सत्ताधारी पक्ष धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ना...

December 26, 2025 9:25 AM

views 23

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादामुळं उद्भवणारे धोके या विषयावर चर्चा करण्यात येईल.   दहशतवाद विरोधी कार्यात सहभागी असलेले सुरक्षा दलातील अधिकारी, आणि न्यायवैद्यक पथकातील अधिकारी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.