राष्ट्रीय

December 26, 2025 9:19 AM

views 15

रेल्वे प्रवासभाडे आकारणीतील बदल लागू

रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही.   या दरवाढीनंतर 500 किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं 10 रुपयांनी वाढणार आहे. तर वातानु...

December 25, 2025 7:29 PM

views 33

संसद क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

देशभरात आयोजित केलेल्या संसद क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप आज झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दूरस्थ पद्धतीने संबोधित केलं. उत्तर मुंबईत कांदिवली इथल्या मैदानावरही क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम झाला. यावेळी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल उपस्थित होते. 

December 25, 2025 7:34 PM

views 44

रेल्वे प्रवासभाडे आकारणीतील बदल उद्यापासून लागू

रेल्वेनं प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते उद्यापासून लागू होणार आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यानंतर द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या किलोमीटर मागे १ पैसा तर  एक्स्रप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना प्रति...

December 25, 2025 3:04 PM

views 18

अंतराळातून आजचा भारत आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि धैर्यवान दिसतो – अंतराळवीर शुभांशु शुक्ला

अंतराळातून आजचा भारत आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि धैर्यवान दिसतो असं प्रतिपादन भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज आयआयटी मुंबईत केलं. अंतराळ स्थानकातल्या वास्तव्यात घडलेल्या गमतीजमती शुक्ला यांनी यावेळी सांगितल्या. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर आणि अंगद प्रताप यावेळी उपस्थित होते.

December 25, 2025 7:26 PM

views 22

नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह

नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. देशभरातल्या चर्चेस आणि प्रार्थनागृहांमधे काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चेसवर रोषणाई करण्यात आली आहे. नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. द...

December 25, 2025 2:48 PM

views 33

नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरु

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमा...

December 25, 2025 2:49 PM

views 40

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयींनी आप...

December 25, 2025 2:27 PM

views 13

तमिळनाडूत तिरुचिरापल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

तमिळनाडूत तिरुचिरापल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर काल अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस दोन कारवर आदळली. यात कारमधून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झाले.

December 25, 2025 2:35 PM

views 23

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार

वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी यंदा १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या २० मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित मुलांना तसंच...

December 25, 2025 2:28 PM

views 30

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस संस्थेचं उपाध्यक्ष पद भारताकडे

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्ष पद आजपासून भारत स्वीकारत आहे. अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणारा हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किंबर्ले प्रोसेस ही संस्था २००३ मधे स्थापन झाली, यात जगभरातली सरकारं, हिरे उद्योग तसंच सामाजिक संघटनांच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.