राष्ट्रीय

May 11, 2025 1:37 PM May 11, 2025 1:37 PM

views 16

भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीचं जगभरात स्वागत

भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी  युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे. हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक, दीर्घ...

May 11, 2025 8:08 PM May 11, 2025 8:08 PM

views 43

आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. १९९८ मध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानात पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली. या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं. पहिलं स्वदेशी विमान हंस-३ च्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवो...

May 10, 2025 8:45 PM May 10, 2025 8:45 PM

views 23

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी आज दुपारी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि...

May 10, 2025 8:42 PM May 10, 2025 8:42 PM

views 10

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.   भविष्यात कुरापाती काढल्यास ऑपरेशन सिंदूर सारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. 

May 10, 2025 8:13 PM May 10, 2025 8:13 PM

views 2

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं येत्या २७ मे रोजी केरळमधे आगमन होईल- हवामान विभाग

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आगमन येत्या २७ मे रोजी केरळात होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. यात ४-५ दिवसांचा फरक पडू शकतो.   १३ मे च्या आसपास नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाचे प्रवक्ते उमाशंकर दास यांनी सांगितलं. दरवर्षी...

May 10, 2025 8:06 PM May 10, 2025 8:06 PM

views 18

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्...

May 10, 2025 3:49 PM May 10, 2025 3:49 PM

views 22

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे ठार

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. मुदस्सर खादियान खास उर्फ अबु जुंदाल, मौलाना मसूद अझहरचा मेव्हणा हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, खालीद उर्फ अबु अकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी त्यांची नावं आहेत. गेल्या ग...

May 10, 2025 3:55 PM May 10, 2025 3:55 PM

views 19

पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले

पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की, मुरीद, चक्लाला, रहिमयार खान या ठिकाणची लष्करी केंद्रं, नियंत्रण केंद्रं, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले ...

May 10, 2025 4:01 PM May 10, 2025 4:01 PM

views 4

युद्धस्थितीत पाकिस्तान जाणूनबुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप

पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे. समाजमाध्यमावर बनावट प्रतिमा, चित्रफिती प्रसृत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे.    पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे, त्याच पद्धतीनं डिजिट...

May 10, 2025 8:29 PM May 10, 2025 8:29 PM

views 10

भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात घट

शाश्वत विकास उद्दिष्ट २०३० ला अनुसरून, भारतात माता आणि बाल मृत्यूच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ने जारी केलेल्या अहवाला नुसार, देशात दर एक लाख बालकांच्या जन्मा मागे माता मृत्युदर १३० इतका होता. तो आता कमी होऊन ९३ वर आला आहे. बालमृत्यू दर २०१४ मध्ये ३९ होता, तो २०२१...