राष्ट्रीय

June 6, 2025 3:12 PM June 6, 2025 3:12 PM

views 10

मणिपूरमध्ये ८ सशस्त्र अतिरेकी अटक

सुरक्षा यंत्रणांनी आज मणिपूरमधे ८ सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. प्रतिबंधित युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलेईपाकचे ३ कार्यकर्ते तसंच प्रतिबंधित पीपल्स लिबेरेशन आर्मी चे ४ कार्यकर्ते इम्फाळ जिल्ह्यातून पकडले गेले. आणखी एकाला बिशनुपूर जिल्ह्यातून पकडण्यात आले.

June 6, 2025 4:13 PM June 6, 2025 4:13 PM

views 6

देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर ठसा निर्माण केला – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा निर्माण केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारनं ११ वर्षात युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यांसारख्या अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ...

June 6, 2025 10:03 AM June 6, 2025 10:03 AM

views 14

प्रधानमंत्री आज जम्मू आणि काश्मीरला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते ४६ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प प्रधानमंत्री राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पाअंतर्गत असलेला चिनाब पूल हा देशातला पहिला ...

June 5, 2025 8:04 PM June 5, 2025 8:04 PM

views 6

जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे- ओम बिर्ला

जगातल्या लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकसंख्या असणारा आणि जागतिक जीडीपीचा ४० टक्के भाग असणारा भारत हा देश जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ब्रासिलिया इथं केलं. जागतिक आव्हानांना तोंड देत ब्रिक्स राष्ट्रांनी आर्थिक आघाडीवर उल्...

June 5, 2025 8:06 PM June 5, 2025 8:06 PM

views 14

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मध्यप्रदेश तसंच तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांना नोटीस

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांची स्वतःहून दखल घेत मध्यप्रदेश तसंच तेलंगणाचे पोलिस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेशात भिंड जिल्ह्यात दोन पत्रकारांच्या बाबतीत पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीबाबत प्रेस क्लबने काढलेल्या निवेदनाची स्वतःहून दखल घेत मानवाधिकार आयोगाने मध्यप्...

June 5, 2025 7:32 PM June 5, 2025 7:32 PM

views 11

बकरी ईदनिमित्त ६ जून २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

केंद्र सरकारनं बकरी ईदनिमित्त ६ जून २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र या पोस्टमधला दावा तथ्यहीन आणि खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.  देशभरात अनेक भागांमध्ये ईद ६ जून रोजी साजरी केली जाणार असल्याची शक्यता असली तरी या दिवशी सरका...

June 5, 2025 6:57 PM June 5, 2025 6:57 PM

views 5

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यासह देशभरात वृक्षारोपण

देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं १९७३ मध्ये आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस १४३ हून अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमां...

June 5, 2025 7:52 PM June 5, 2025 7:52 PM

views 11

बंगळुरू चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागितला सद्यस्थिती अहवाल

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरी बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सद्यस्थिती अहवाल मागितला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा विजय साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात हजारो क्रिकेटप्रेमींनी विविध प्रवेशद्वारांमधून प्रवेश करण्याचा ...

June 5, 2025 6:41 PM June 5, 2025 6:41 PM

views 9

निवडणुका संपल्यानंतर बिनचूक अहवाल तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड प्रणाली सुरू

  केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुका संपल्यानंतर तयार होणारे विविध आकडेवारी विषयक अहवाल जलदगतीनं तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड ही एक नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली सुरू केली आहे. इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची स्वतःची मात्र कायद्यानं बंधनकारक नसलेली माहिती प्रणाली असेल. या माध्यमातून निवडणुकांनंतरची ...

June 5, 2025 2:43 PM June 5, 2025 2:43 PM

views 13

दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या ५ शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण

भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिकेबद्दल जगाला  सांगण्यासाठी गेलेल्या सात शिष्टमंडळांपैकी पाचवं शिष्टमंडळ आज भारतात परतलं आहे. काल यापैकी चार शिष्टमंडळं देशात परतली. संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा तसंच द्रमुक खासदार कन्निमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस ज...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.