मिश्र

May 12, 2025 1:38 PM May 12, 2025 1:38 PM

views 3

भारतातील ३२ विमानतळे आता नागरी उड्डाणासाठी सज्ज

भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणांसाठी बंद केलेली ३२ विमानतळं आता सुरू झाली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी थेट विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असंही प्राधिकरणानं सांगि...

May 12, 2025 11:40 AM May 12, 2025 11:40 AM

views 8

तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का

भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास 5.7 रिख्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होते.

May 10, 2025 12:55 PM May 10, 2025 12:55 PM

views 13

देशात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

देशाच्या वायव्य, मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशात आज, तर आसाम, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या पर्वत रांगांमध्ये उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.  येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्याने दोन ते चार अं...

May 10, 2025 12:51 PM May 10, 2025 12:51 PM

views 6

तेलंगणामध्ये ३८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणामध्ये काल ३८ माओवाद्यांनी भद्रादी कोठागुडम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये ८ महिला आणि २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातले आहेत.   यंदाच्या जानेवारी महिन्यापासून या जिल्ह्यातल्या २ ६५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.  शरण आ...

May 8, 2025 2:47 PM May 8, 2025 2:47 PM

views 21

उत्तराखंडमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते.    डेहराडून इथल्या सहस्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघा...

May 8, 2025 2:40 PM May 8, 2025 2:40 PM

views 9

जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद

जम्मू- काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबा सेरी इथं पावसामुळं चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असून पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक माहिती दिली जाईल  असं जम्मूतल्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आह...

May 8, 2025 1:18 PM May 8, 2025 1:18 PM

views 16

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जीयंद बलूच यानं दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.   या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानातली सततची संघर्षात्मक स्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे. इथले फुटीरतावादी गट द...

May 5, 2025 1:35 PM May 5, 2025 1:35 PM

views 10

गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये आज मुसळधार पाऊसाचा अंदाज

गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर बिहार, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आसाम, मणिपूर आणि पश्चिम बंगाल मध्ये उद्या मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ मध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, ...

May 3, 2025 6:37 PM May 3, 2025 6:37 PM

views 7

लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू

गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती.   यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून धक्काबुक्की झाली आणि अ...

April 30, 2025 4:22 PM April 30, 2025 4:22 PM

views 7

कोलकाता इथं एका हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मध्य कोलकाता इथं एका हॉटेलला  काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत १४ मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं  कारण अद्याप कळलेलं  नाही.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प...