डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू

गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती.

 

यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून धक्काबुक्की झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण दल यांनी घटनास्थळी पोचून त्यांनी मदतकार्य सुरु केलं. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं.

 

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना  व्यक्त केली आहे. या कठीण प्रसंगात केंद्र सरकारचा   गोवा सरकारला पूर्ण पाठिंबा असून आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी  स्थानिक प्रशासन तत्पर असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा