आंतरराष्ट्रीय

June 5, 2025 9:43 AM June 5, 2025 9:43 AM

views 63

अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घ चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. मात्र, या त्यातून युक्रेनमध्ये तातडीनं शांतता होणार नाही, असं पुतिन यांनी मान्य केलं. तसंच युक्रेननं रशियाच्या विमानतळांवर केलेल्या हल्ल्याला रशिया उत्तर देईल असा इशाराही दिला. दोन्ही नेत्यांमध्ये 85 मि...

June 4, 2025 10:40 AM June 4, 2025 10:40 AM

views 9

दक्षिण कोरियात लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी

दक्षिण कोरियात झालेल्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी झाले असून, ते नवे राष्ट्रपती होणार आहेत. त्यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, सत्ताधारी पीपल पॉवर पार्टीचे नेते किम मून-सू यांचा पराभव केला. मून यांनी जनतेच्या निर्णयाचे नम्रपणे स्वीकार करत असल्याचे सांगत, ली यांचे अभिनंदन केले. ...

June 3, 2025 1:36 PM June 3, 2025 1:36 PM

views 17

ग्रीस आणि टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के

ग्रीसमध्ये टर्कीच्या सीमेजवळ आज सकाळी डोडेकेनीज बेटांवर ६ पूर्णांक २ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याच सुमाराला टर्कीमध्ये किनारपट्टी भागातल्या मारमारिस शहरालाही भूकंपाचा धक्का बसला. तो ५ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा होता. यामध्ये  मारमारिस शहरातले दोन नागरिक जखमी झाले.

June 3, 2025 3:37 PM June 3, 2025 3:37 PM

views 10

इटलीमधल्या माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक

इटली मधल्या माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली. उद्रेकामुळे उत्सर्जित होणाऱ्या लाव्हारसाच्या प्रवाहानं नैसर्गिक धोक्याची पातळी ओलांडली नसून, त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं सिसिलीचे राष्ट्राध्यक्ष रेनाटो शिफानी यांनी ...

June 3, 2025 10:42 AM June 3, 2025 10:42 AM

views 7

दक्षिण कोरियामध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान

दक्षिण कोरियामध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान सुरू आहे. यून सुक येओल यांना लष्करी राजवट लागू केल्यामुळे पदच्युत करण्यात आलं होतं. या निवडणुकीत उदारमतवादी ली जे म्युंग बाजी मारण्याची शक्यता असल्याचे संकेत स्थानिक पाहाणीत दिसून आले आहेत.

June 2, 2025 3:05 PM June 2, 2025 3:05 PM

views 6

प्रधानमंत्री आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतराळ यासह इतर क्षेत्...

June 2, 2025 2:44 PM June 2, 2025 2:44 PM

views 6

हमासच्या राफा इथं झालेल्या गोळीबारात ३० जण ठार, तर १७९ जखमी

हमासच्या राफा इथं अन्न साहाय्य वितरण केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात ३० पेक्षा अधिक लोक ठार तर १७९ लोक जखमी झाले आहेत. इजरायली सैन्यानं आणि अमेरीका आधारित गाझा मानवतावादी फाऊंडेशननं हिंसेच्या या दाव्यांना नकार दिला आहे. दरम्यान हमासनं गाझा शस्त्रसंधी करारावर ताबडतोब नवीन अप्रत्यक्ष चर्चा सुरू करण्याची...

June 1, 2025 6:39 PM June 1, 2025 6:39 PM

views 9

प्रधानमंत्री आणि आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीविषयी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत...

June 1, 2025 5:00 PM June 1, 2025 5:00 PM

views 4

पोलंडमध्ये अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान सुरु

पोलंडमध्ये आज अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान होत आहे. वॉर्सॉचे महापौर राफाल ट्र्झास्कोव्स्की आणि इतिहासकार करोल नव्रॉकी यांच्यात ही चुरशीची लढत आहे.   ट्र्झास्कोव्स्की हे उदारमतवादी युरोपियन युनियनचे समर्थक असून, न्यायसुधारणा आणि गर्भपात हक्क यांचे समर्थक आहेत. तर नव्रॉकी हे पारंपरिक मूल...

June 1, 2025 1:45 PM June 1, 2025 1:45 PM

views 2

रशियात रेल्वे अपघातात सात जणांचा मृत्यू

रशियात झालेल्या एका रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. अपघातग्रस्त रेल्वे गाडी मॉस्कोहून क्लिमोवकडे जात असताना वायगोनिचस्की इथं ती रुळावरून घसरली. ब्रायनस्क प्रदेशाच्या पश्चिमेकडच्या भागात एक पूल कोसळल्यानं ही रेल्वे रुळावरून घसरल्याचं रशियाच्या वृत्तसंस्थेनं द...