रशियात झालेल्या एका रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. अपघातग्रस्त रेल्वे गाडी मॉस्कोहून क्लिमोवकडे जात असताना वायगोनिचस्की इथं ती रुळावरून घसरली. ब्रायनस्क प्रदेशाच्या पश्चिमेकडच्या भागात एक पूल कोसळल्यानं ही रेल्वे रुळावरून घसरल्याचं रशियाच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
Site Admin | June 1, 2025 1:45 PM | Russia Train Accident
रशियात रेल्वे अपघातात सात जणांचा मृत्यू
