October 12, 2025 4:42 PM

views 47

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीशाचं प्रतिपादन

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात, त्यांचं अधिकारक्षेत्र स्वतंत्र असलं, तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि ...

October 12, 2025 2:27 PM

views 16

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक अटक वॉरंट जारी

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं केलेल्या आरोपांवरून १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बांग्लादेशच्या लष्करानं दिली. यातील १४ अधिकारी सेवेत कार्यरत असून एक अधिकारी निवृत्तीपूर्व सुट्...

October 12, 2025 2:24 PM

views 51

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू

मादागास्करमध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अँतानानारिव्होमध्ये निदर्शनं सुरू केली आहेत. वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन, मादागास्कर मधल्या तरुणाईनं सरकार विरोधी आंदोलन छेडलं असून, काल त्याचा उद्रेक झाला, आणि हजारो निदर...

October 12, 2025 2:21 PM

views 44

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु

तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून, बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं क...

October 12, 2025 2:10 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडमध्ये एकात्मिक अ‍ॅक्वा पार्कची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात त्झुडिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान-ॲक्वा पार्कची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केली. नागालँडमधील हे पहिले मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल. ...

October 12, 2025 2:01 PM

views 180

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह, पालघरमधल्या पर्णका, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत ...

October 12, 2025 1:53 PM

views 12

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त, ८ जणांना अटक

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघडकीला आणलं आहे. याप्रकरणी १२ जणांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या आठ जणांना अटक केली. या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून अटक केली. यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती. अटक केलेल्यांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन...

October 12, 2025 1:50 PM

views 247

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री, कोलंबो इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय न...

October 12, 2025 1:41 PM

views 52

ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचे निधन

ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. १९७७ सालच्या ‘अ‍ॅनी हॉल’ या चित्रपटातली ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि ‘द गॉडफादर’ या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. कीटन यांनी ६०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं....

October 12, 2025 1:01 PM

views 28

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, मेघायल, कर्नाटकचा समुद्रकिनारा, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि कर्नाटकचा दक्षिणी भागातही जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. प...