October 16, 2025 6:50 PM

views 13

गुजरातमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार

गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल वगळता इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत गांधीनगर इथे हा शपथविधी होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समाविष्ट झ...

October 16, 2025 3:35 PM

views 18

मिशन उडान अंतर्गत अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

मिशन उडान अंतर्गत अकोला जिल्ह्यात पोलीस दलात महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गंत काल  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस काका, पोलिस दिदी आणि एसजेपीयू पथकासाठी कार्यशाळा घेण्यात आली.   मार्गदर्शनासाठी आलेल्या तज्ज्ञां...

October 16, 2025 3:28 PM

views 82

प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचं काल दीर्घ आजाराने निधन

प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ५२ वर्षांच्या होत्या. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.   त्यांची सोलमेट ही कादंबरी तर सारीनास हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. शंभरकर यांच्या पार्थिवावर आज...

October 16, 2025 3:27 PM

views 52

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी कॉंक्रीटीकरण करण्यात येणार

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचं  रूंदीकरण करून कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दुकाने, हॉटेल्स आणि इतर  बांधकामं हटवण्याची मोहिम नाशिक महानगर विकास प्राधीकरणानं काल सुरु केली.    या विरोधात पिंपळगाव बहुला इथं  रास्ता रोको आंदोलन करण्यात आल...

October 16, 2025 7:10 PM

views 85

राज्यातल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर

बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांच्या, तसंच या महापालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानुसार बृहन्मुंबई  महानगरपालिकेचे कर्मचारी, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  ३१ हजार...

October 16, 2025 3:13 PM

views 52

देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळं सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली.   बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आ...

October 16, 2025 6:56 PM

views 49

सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू – केंद्रीय गृहमंत्री

भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती संबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ए...

October 16, 2025 3:08 PM

views 58

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार

खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलं असात  महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या निव...

October 16, 2025 3:01 PM

views 71

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भरतीचा प्रस्ताव

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भर्तीसाठी रेल्वे मंत्रालयाला अर्ज करण्यात आला असून येत्या एक ते दोन महिन्यात त्याबद्दल अनुमोदन मिळण्याची शक्यता असल्याचं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. ते काल कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या पस्तिसाव्या स्थापना दिनानिमित्त वाशी इथे आयोजित कार्यक्...

October 16, 2025 2:59 PM

views 18

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली प्रदूषणात वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत ...