प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ५२ वर्षांच्या होत्या. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.
त्यांची सोलमेट ही कादंबरी तर सारीनास हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. शंभरकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी खारघर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.