कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भर्तीसाठी रेल्वे मंत्रालयाला अर्ज करण्यात आला असून येत्या एक ते दोन महिन्यात त्याबद्दल अनुमोदन मिळण्याची शक्यता असल्याचं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. ते काल कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या पस्तिसाव्या स्थापना दिनानिमित्त वाशी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्थानिक पदभरती प्रक्रिया राबवली जात असून येत्या २७ ऑक्टोबर रोजी ७९ जागांसाठी परीक्षा होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. कोकण रेल्वेला कर्जाची परतफेड करण्यासाठी ७ हजार ७७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला आहे. तो प्रस्ताव मंजूर झाला तर कोकण रेल्वे कर्जमुक्त होईल, असंही झा यावेळी म्हणाले.