डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय अपूर्ण – प्रधानमंत्री

भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून, पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते आज पश्चिम बंगालमध्ये अलीपुरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी १ हजार १७ कोटी रुपये खर्च झाले असून, पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल. 

 

विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं प्रधानमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.