January 6, 2026 1:14 PM

views 25

बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना विस्तृत कारवाई अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

पश्चिम बंगालमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण कामाच्या वेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा निवडणूक निरीक्षक सी. मुरूगन यांनी आरोप केल्या प्रकरणी, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विस्तृत कारवाई अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ३० डिसेंबर रोजी २४ परगणा जिल्ह्यात निरीक्षक म्हणून काम करताना आपल्यावर हल्ला झाल्याचा मुरुगन यांचा आरोप आहे.  या प्रकरणी  मुरूगन यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात न आल्याचं आढळल्याचं निरीक्षण आयोगाने नोंदव...

January 5, 2026 1:22 PM

views 35

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी निरीक्षकावर हल्ला, निवडणूक आयोगाची कारवाई अहवालाची मागणी

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण शिबिरांना भेट देताना मतदार यादी निरीक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई अहवालाची मागणी केली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण शिबिरांना भेट देतेवेळी मतदार यादी निरीक्षक सी. मुरुगन यांच्यावर जमावाने हल्ला केला. निवडणूक आयोगाने या प्रकरणासंदर्भातल्या कारवाईचा अहवाल उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, यापुढे अशा प्रकारच्या भेटीवेळी सुरक...

December 13, 2025 8:56 PM

views 21

कोलकात्यातल्या सॉल्ट लेक कार्यक्रमाच्या आयोजकाला अटक

दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर पुन्हा भारतभेटीवर आला आहे. गोट इंडिया टूर या खासगी दौऱ्याच्या निमित्तानं तो आज पहाटे कोलकात्यात दाखल झाला.  कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर  हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं. पण तो तिथे काही मिनिटंच थांबून निघून गेला. हजारो रुपयांची तिकिटं काढून आलेल्या चाहत्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावल्या. यामुळे तिथे काही काळ तणावाचं वात...

December 13, 2025 1:37 PM

views 34

पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे.    ८५ लाख १ हजार ४८६ मतदारांच्या वडिलांचे नाव चुकीचे असल्याचे आढळले. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ११ पूर्णांक ९ दशांश टक्के आहे. आई-वडिल आणि मुलांच्या वयातल्या अंतरात मोठी तफावत आढळून येण्याचं प्रमाणही खूप आहे. वय ४५ ...

October 12, 2025 7:35 PM

views 58

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांच्या सुरक्षिततेवरून केलेल्या वक्तव्यावर टीका होत आहे.

October 5, 2025 8:16 PM

views 34

पश्चिम बंगालमधे भूस्खलनाच्या घटनांमधे २३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू  झाला आहे. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे, तसंच बचाव आणि मदतकार्य जलद व्हावं यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ममता ...

October 5, 2025 1:41 PM

views 37

पश्चिम बंगालमधे अतिवृष्टीमुळे किमान २० जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे किमान २० जणांचा मृत्यू  झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. दार्जिलिंग, कुरेसाँग, मिरिक कालिंपाँग आणि सिक्किममधे जनजीवन विस्कळीत झालं असून एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रसरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत पुरवली जाईल असं प्रधानमं...

August 3, 2025 12:46 PM

views 22

उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून ; मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या ईशान्य भारतातील काही भागातही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे.   नवी दिल्ली एनसीआरमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ...

June 19, 2025 8:01 PM

views 42

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबमधल्या लुधियाना मतदार संधात सुमारे ४९ टक्के, मतदान झालं.  या पाचही मतदारसंधांमधली मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे. 

May 29, 2025 3:19 PM

views 28

विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय अपूर्ण – प्रधानमंत्री

भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून, पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते आज पश्चिम बंगालमध्ये अलीपुरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी १ हजार १७ कोटी रुपये खर्च झाले असून, पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल.    विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बं...