December 30, 2025 8:21 PM

views 70

२०४७ मधला विकसित भारत हीच भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असायला हवी – प्रधानमंत्री

२०४७ मध्ये भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच  भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असली पाहिजे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थतज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांना ते संबोधित करत होते. विकसित भारतासाठी आत्मनिर्भरता आणि रचनात्मक बदल ही या बैठकीमागची संकल्पना होती. विकसित भारताचं सरकारचं उद्दिष्ट जनसामान्यांमध्ये पोहोचल्याचं ते यावेळी म्हणाले.    अर्थतज्ञांनी या बैठकीत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली उत्पादनक्ष...

December 30, 2025 8:11 PM

views 40

भारताची सांस्कृतिक क्षेत्रातली वाटचाल

२०२५ हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे. भारताच्या या वर्षातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाटचालीविषयी…   मराठा सैन्यदलाचा इतिहास सांगणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झाला, तसंच दिवाळी या सणानं युनेस्कोच्या अद्वितीय वारशाच्या यादीत स्थान मिळवलं. भारताच्या हस्तलिखितांचं जतन, डिजिटायजेशन आणि प्रसार करण्यासाठी ग्यान भारतम या उपक्रमाची सुरुवात यंदा झाली. लोक...

December 29, 2025 7:41 PM

views 34

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता आणि सामर्थ्य

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.   २०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. मेक इन इंडिया म्हणजेच स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राने गेल्या २०१४मध्ये ४० हजार कोटींपासून ते यंदा १ कोटी ५४ लाख रुपयांपेक्षा जास्त पल्ला गाठला आहे. जागतिक पातळीवर संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारताच्या उदयाचं हे प्रतीक आहे.   संरक्...

December 29, 2025 1:18 PM

views 56

भारतासाठी २०२५ वर्ष संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष  भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.   २०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भारताने जगाला दिला. दहशतवादी हल्ल्यांना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर, अण्वस्त्रांच्या धमकीला भीक न घालणं, दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांमधे फरक न करणं, तसंच सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य...

December 28, 2025 8:05 PM

views 55

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारचे विविध उपक्रम

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत.  नव्या भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेली धोरणं पुढीलप्रमाणे...   भारताच्या विकासाच्या प्रवासात २०२५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमधे यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. यात काही टप्पे हे ऐतिहासिक आहेत. मिझोराम हे ईशान्य भागातलं राज्य प्रथमच भारताच्या रेल्वेजाळ्याशी जोडलं गेल...

December 16, 2025 8:49 PM

views 190

‘विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक २०२५’ लोकसभेत सादर

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना (ग्रामीण) विधेयक, २०२५ अर्थात विकसित भारत - जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल.   (विद्यमान मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. प्रस्तावित विधेयकात सव्वाशे दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे. पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर ६० दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. यादरम्यान मनरेगाचं ...

November 8, 2025 5:31 PM

views 37

देशाचं शहरीकरण हा विकसित भारताचा मार्ग – मंत्री मनोहर लाल

देशात होणारे शहरीकरण हा विकसीत भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू झालेल्या राष्ट्रीय शहर संमेलन २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.    देशात होणारे शहरीकरण हे नागरिक केंद्रीत, सर्वसमावेशी आणि शाश्वत असावेत, असं मतही मनोहर लाल यांनी यावेळी व्यक्त केलं. गेल्या दशकांच्या तुलनेत शहरातील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. यातूनच स्वच्छ, आरोग्यदायी आणि समृद्ध शहरांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध...

October 3, 2025 1:13 PM

views 74

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP वृद्धीचा दर 8 % वाढवण्याची गरज – अर्थमंत्री

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

May 30, 2025 9:25 AM

views 58

कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील महत्त्वाचं पाऊल – प्रधानमंत्री

देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला. त्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ संदेश प्रसारित केला. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा; कृषी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

May 29, 2025 3:19 PM

views 28

विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय अपूर्ण – प्रधानमंत्री

भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून, पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते आज पश्चिम बंगालमध्ये अलीपुरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी १ हजार १७ कोटी रुपये खर्च झाले असून, पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल.    विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बं...