डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्युमुखी पडले असून सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. यामध्ये सामील असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.