ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. इराणमधून मायदेशी परतलेल्या ३ हजार ५९७ आणि इस्रायलमधून आलेल्या ८१८ व्यक्तींचा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त ९ नेपाळी, ४ श्रीलंकेचे आणि एका भारतीय नागरिकाच्या इराणी पत्नीचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.