October 19, 2025 10:13 AM

views 42

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांची तत्काळ युद्धबंदीवर सहमती

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी काल ही घोषणा केली. कतारची राजधानी दोहा इथं, कतार आणि तुर्किएच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा करार करण्यात आला. या वाटाघाटींदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली असल्याचं कतारच्या परराष्...

June 27, 2025 1:57 PM

views 36

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. इराणमधून मायदेशी परतलेल्या ३ हजार ५९७ आणि इस्रायलमधून आलेल्या ८१८ व्यक्तींचा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त ९ नेपाळी, ४ श्रीलंकेचे आणि एका भारतीय नागरिकाच्या इर...

June 27, 2025 1:40 PM

views 26

ईराणच्या तीन मुख्य अण्वस्त्र तळांचं मोठं नुकसान झाल्याचा इस्रायलच्या IDF सेनेकडून दावा

ईराणविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये त्यांच्या तीन मुख्य अण्वस्त्र तळांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायलच्या IDF या सशस्त्र सेनेनं केला आहे. गेल्या १२ दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू असून ईराणमधील आण्विक आणि मिसाईल नष्ट करणं हे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचं IDF नं सांगितलं. ईराणमध्ये मिसाईल निर्मिती आणि आण्विक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन हाती घेतलं.   आण्विक कार्यक्रम आणि मिसाईलच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ११ वैज्ञानिक या ऑपरेश...

May 10, 2025 8:45 PM

views 40

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी आज दुपारी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज निवेदनात दिली. दरम्यान, भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिक...

May 10, 2025 8:42 PM

views 21

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून प्रत्युत्तर देण्याचा भारताचा निर्णय

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.   भविष्यात कुरापाती काढल्यास ऑपरेशन सिंदूर सारखं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. 

January 19, 2025 1:48 PM

views 21

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला युद्धविराम सुरू न करण्याचे निर्देश नेत्यान्याहू यांनी संरक्षण दलांना दिले असल्याचं इस्रायलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हमासनं मात्र हा विलंब तांत्रिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे. युद्धविराम कर...

August 4, 2024 2:02 PM

views 39

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना केली आहे. अनेक विमान कंपन्यानी लेबनाॅन मधल्या हवाई सेवा रद्द केल्या असल्या तरी अद्याप काही विमानसेवा उपलब्ध आहेत असं लेबनाॅन मधल्या अमेरिकी दूतावासानं सांगितलं आहे. दरम्यान स्वीडननं सर्वात आधी बेरुट मधला दूतावास बंद केला आहे.

July 12, 2024 10:33 AM

views 42

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीती निर्माण करणाऱ्या घटना असून जागतिक सुरक्षेसाठी हे आव्हान असल्याचं नाटोनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेत चीनचा निषेध करणारं संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं.