ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत आगमन झालं. ते आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांचं समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे स्वागत केलं.
कीर स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहतील. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच मुंबईत फिनटेक फेस्ट इथं देखील उपस्थित राहणार आहेत. स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधील व्यापारी प्रतिनिधीमंडळ आहे.