एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आयएसआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूल च्या दोन सदस्यांना अटक केली आहे. २०२३ साली महाराष्ट्रात पुणे इथं आयईडी ही स्फोटकं बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयए नं त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता इथून परतले होते.
हे दोन्ही आरोपी गेली दोन वर्ष फरार होते आणि एनआयएच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं. दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयएनं प्रत्येकी ३ लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एनआयए च्या सूत्रांनी सांगितलं.