October 26, 2025 8:18 PM October 26, 2025 8:18 PM

views 150

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला.    या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.

July 16, 2025 2:48 PM July 16, 2025 2:48 PM

views 24

एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर या संघाच्या कर्णधार पदाची धुरा असेल.   तिच्यासह स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, क्रांची गौड, अमनज्योत कौर, सायली गणेश, श्री चरणी, राधा यादव, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा हे खेळाडू या संघात आहेत. यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला होता.

June 29, 2025 3:40 PM June 29, 2025 3:40 PM

views 48

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव

महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंडमधे ट्रेंट ब्रिज इथं झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ९७ धावांनी पराभव केला. क्रिकेटच्या या प्रकारात स्मृती मानधनाने कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकत तडाखेबंद ११२ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

May 11, 2025 5:08 PM May 11, 2025 5:08 PM

views 24

Women Cricket : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.   भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. भारतानं निर्धारित ५० षटकांमध्ये सात गडी गमावून ३४२ धावा केल्या. १०१ चेंडूत ११६ धावा करून शानदार शतक झळकावणाऱ्या स्मृती मानधनाने सर्वाधिक धावा काढल्या. तिचं एकदिवसीय क्रिकेटमधलं हे अकरावं शतक होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्या...

May 9, 2025 8:04 PM May 9, 2025 8:04 PM

views 20

महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे तिरंगी एकदिवसीय मालिकेत, आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय मिळवला.    दक्षिण अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या. ॲनेरी डेर्क्सननं १०४, तर क्लोई ट्रायॉननं ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं ५ बळी घेतले. विजयासाठी ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४३ व्य़ा षटकातच २३९ धावांवर आटोपला.   चामरी अटापट्टुच्या ५१ आणि अनुष्का संजीवनीच्या नाबाद ४३ धावा वगळता श्रीलंकेच्या फलं...

May 7, 2025 7:36 PM May 7, 2025 7:36 PM

views 21

Women Cricket : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्जनं १२३ धावा केल्या. दिप्ती शर्मानं ९३, तर स्मृती मंधानानं ९१ धावांचं योगदान दिलं.   भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला ५० षटकात ७ गडी गमावून ३१४ चं धावा करता आल्या.  एनेरी डर्कसेननं सर्वाधिक ८१, तर कर्णधार क्लोई ट्रायॉननं ६७ धावा केल्या. भारतातर्फे अमनज्योत कौर...

May 4, 2025 7:36 PM May 4, 2025 7:36 PM

views 19

Women Cricket : श्रीलंकेचा भारतावर ३ गडी राखून विजय

महिला क्रिकेटमधे, तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर ३ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून २७५ धावा केल्या. रिचा घोषनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे सुगंधिका कुमारी आणि चामरी अटापट्टू यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.    श्रीलंकेनं ७ गड्यांच्या मोबदल्यात, सामन्यातले ५ चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य पार करत २७८ धावा केल्या. निलाक्षीका सिल्वानं ३३ चेंडूत ...

January 31, 2025 7:51 PM January 31, 2025 7:51 PM

views 11

U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत

१९ वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित केलं आहे. आज क्वालालंपूर इथं झालेल्या  उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं,  इंग्लंडवर ९ गडी राखून मात केली.    प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा केल्या. भारतातर्फे परुनिका सिसोदिया, आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी ३, तर आयुषी शुक्लानं २ गडी बाद केले. विजयासाठी ११४ धावांचं लक्ष्य भारतानं १५ षटकातच एका गड्याच्या मोबदल्यात ११७ धावा करत पार केलं.    त्या आधी झालेल्या दुसऱ्या उपां...

January 28, 2025 1:43 PM January 28, 2025 1:43 PM

views 12

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्सच्या फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. जी कमलीनी हिने अर्धशतक केलं. त्याआधी स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी अंतिम चारमधे आपल...

January 21, 2025 3:33 PM January 21, 2025 3:33 PM

views 5

Women Cricket : १९ वर्षांखालच्या T20 आयसीसी विश्वचषक सामन्यात भारताची मलेशियावर मात

महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालच्या टी ट्वेंटी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अ गटातल्या सामन्यात आज यजमान मलेशियाचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी क्वालालंपूरच्या मैदानात उतरलेल्या मलेशियाला फक्त ३१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या वैष्णवी शर्मानं ५ तर आयुषी शुक्लानं ३ गडी बाद केले. भारतानं विजयासाठी असलेलं ३२ धावांचं लक्ष्य दोन षटकं आणि पाच चेंडूतच पूर्ण केलं.