डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 7, 2025 7:36 PM | Women Cricket

printer

Women Cricket : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्जनं १२३ धावा केल्या. दिप्ती शर्मानं ९३, तर स्मृती मंधानानं ९१ धावांचं योगदान दिलं.

 

भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला ५० षटकात ७ गडी गमावून ३१४ चं धावा करता आल्या.  एनेरी डर्कसेननं सर्वाधिक ८१, तर कर्णधार क्लोई ट्रायॉननं ६७ धावा केल्या. भारतातर्फे अमनज्योत कौरनं ३, तर दिप्ती शर्मानं २ बळी मिळवले. शतकीवीर जेमिमा रॉड्रिग्ज सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा