July 21, 2025 7:49 PM July 21, 2025 7:49 PM

views 36

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष सुरुच

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष शांततेच्या मार्गानं त्यावर लवकरात लवकर संपवण्याची काढण्याची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची इच्छा असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका मुलाखतीत  सांगितलं.    युक्रेनबरोबरच्या शांतता करारात चार ठिकाणांहून युक्रेन सैन्यानं माघार घ्यावी, युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा मागं घ्यावी आणि नाटो सैनिकांना तैनात न करणं या मुद्द्यांचा समावेश असावा, हे याआधीही  रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचं पेस्कोव्ह यांनी सांगितलं....

July 4, 2025 8:01 PM July 4, 2025 8:01 PM

views 13

रशियाचे पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू

रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले. रशियानं केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी दिली. या हल्ल्यांत २३ नागरिक जखमी झाले आहेत.   युक्रेनमधील ५५० स्थळांना रशियानं लक्ष्य केलं होतं. यासाठी ३३० रशियन -इराणी बनावटीची शाहेड ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. रशियानं केलेले २७० परतवून लावले आणि तर २०८ ड्रोन नष्ट केल्याची माहिती झेलेन्सकी यांनी दिली. रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे राजधानी कीवसह ...

July 4, 2025 2:50 PM July 4, 2025 2:50 PM

views 37

आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काल झालेल्या दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उषाकोव्ह यांनी दिली. हा संघर्ष लवकरात लवकर संपवावा हे ट्रम्प यांचं आवाहन पुतीन यांनी फेटाळलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र युक्रेनसोबत राजकीय संवादाच्या माध्यमातून या संघर्षावर तोडगा...

June 19, 2025 10:54 AM June 19, 2025 10:54 AM

views 12

इस्राईल आणि इराण संघर्षात रशिया करणार मध्यस्थी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्राईल आणि इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सेंट पीट्सबर्ग आर्थिक मंच परिषदेगरम्यान पुतिन यांनी हा प्रस्ताव मांडला. मॉस्कोच्या मध्यस्थीमुळे इराणला शांततापूर्ण आण्विक कार्यक्रम सुरू ठेवता येईल आणि इस्राईलच्या सुरक्षाविषयक चिंतांचं समाधान होईल असा दावा त्यांनी केला आहे                                                                                                                                                                                        ...

June 7, 2025 1:27 PM June 7, 2025 1:27 PM

views 48

रशियानं युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात 3 ठार, २१ जण जखमी

युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर रशियानं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ३ जण ठार, तर २१ इतर जखमी झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांतला रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. यात १८ इमारती आणि १३ घरांचं नुकसान झालं आहे.

June 6, 2025 8:27 PM June 6, 2025 8:27 PM

views 50

यूक्रेनचे १७४ ड्रोन रशियानं केले नष्ट

रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने यूक्रेनचे १७४ ड्रोन अडवून ते नष्ट केले आहेत. मॉस्को, क्रिमिया यासह अनेक ठिकाणांच्या दिशेने हे ड्रोन येत असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. तसंच, काळ्या समुद्रावरून येणारी यूक्रेनची क्षेपणास्त्रंही रशियाने नष्ट केली आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत.  

June 5, 2025 9:43 AM June 5, 2025 9:43 AM

views 64

अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घ चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. मात्र, या त्यातून युक्रेनमध्ये तातडीनं शांतता होणार नाही, असं पुतिन यांनी मान्य केलं. तसंच युक्रेननं रशियाच्या विमानतळांवर केलेल्या हल्ल्याला रशिया उत्तर देईल असा इशाराही दिला. दोन्ही नेत्यांमध्ये 85 मिनिटं चर्चा झाली. ही चर्चा चांगली झाली, मात्र त्यातून लगेच शांतता प्रस्थापित होणार नाही, असं ट्रम्प यांनीही मान्य केलं. दरम्यान पुतिन यांनी काल सहकारी पक्षांबरोबर झालेल्या एका बैठकीत युक्रेनबरोबर सर्वस...

May 29, 2025 1:32 PM May 29, 2025 1:32 PM

views 29

रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांच्याकडून प्रधानमंत्र्यांची प्रशंसा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाठी असलेल्या दोषींना शोधून त्यांना दंडित करण्याबाबत रशियाचे राजदूत देनिस अलिपॉव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेचे समर्थक असल्याची ग्वाही त्यांनी दिली.    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे यावर्षी भारताला भेट देण्याची शक्यता आहे असं क्रेमलिननं म्हटलं आहे. भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी अजून दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांचं एकमत असल्याचंही क्रेमलीननं म्हटलं आहे.

May 24, 2025 2:28 PM May 24, 2025 2:28 PM

views 26

रशिया आणि युक्रेनकडून प्रत्येकी ३९० कैदी मुक्त

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आतापर्यंत प्रत्येकी ३९० कैद्यांना मुक्त केलं आहे. या युद्धात कैद्यांची ही  सर्वात मोठी सुटका मानली जात आहे. इस्तंबूल इथं दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक सामंज्यस्य करार झाला असून आगामी काळात दोन्ही देशांकडून आणखी काही कैद्यांची सुटका होणार असल्याची शक्यता आहे.   सुटका केलेल्या युक्रेनियन कैद्यांना उत्तर चेर्रनिव्हिव्ह इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रशियाचे सुटका केलेले कैदी सध्या बेलारुसमध्ये असून त्यांना रशियामध्ये हलवण्यापूर्वी व...

May 20, 2025 10:03 AM May 20, 2025 10:03 AM

views 17

रशिया-युक्रेन युध्दबंदीसाठीच्या चर्चेला अमेरिका तयार

रशिया आणि युक्रेनदरम्यान लवकरच युध्दविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युध्द संपेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजामाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या बरोबर दुरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही आपण युक्रेनसोबत संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. रशियानं बिनशर्त युद्धबंदी करावी असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झ...