September 30, 2024 6:51 PM

views 50

रशियाचा यूक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला

रशियाने आज पहाटे यूक्रेनची राजधानी कीव इथे ड्रोन हल्ला केला. रशियाने डागलेल्या ७३ पैकी ६७ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रांपैकी एक पाडलं. या दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती यूक्रेन सैन्याने दिली आहे.

September 29, 2024 2:49 PM

views 27

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाकडून निषेध

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. इस्राएलने काल लेबनॉनची राजधानी बैरुट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला मारला गेला. इस्राएलने ही आणखी एक राजकीय हत्या केली असून लेबनॉनवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान नसरल्ला मारला गेला त्याचं समर्थन करणारं निवेदन इस्राएलने जारी केलं आहे. हिजबोलाने पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यात आपलं युद्ध चालू राहील असं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवडाभरात इसराएलने लेबनॉनवरचे हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे प्...

September 15, 2024 3:11 PM

views 49

रशिया आणि युक्रेननं संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले

रशिया आणि युक्रेननं त्यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले आहेत. कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या एकशे तीन रशियन सैनिकांची, एकशे तीन युक्रेनियन युद्धकैद्यांच्या बदल्यात सुटका करण्यात आली आहे, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. युनायटेड अरब अमिरातने युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी मध्यस्थी केली आहे.  

September 13, 2024 3:24 PM

views 42

रशियाने ६ ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली

हेरगिरी आणि घातपाताचा ठपका ठेवत रशियाने मॉस्कोमधल्या सहा ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली आहे. युक्रेनसोबतच्या संघर्षात मॉस्कोचा पराभव करण्याच्या हेतूने हे अधिकारी काम करत असल्याचा आरोप रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस या संस्थेने केला आहे. लंडन इथलं ब्रिटीश परराष्ट्र विभागाचं कार्यालय युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचा पराभव करण्यासाठी पावलं उचलत आहे, असंही या संस्थेने म्हटलं आहे. मॉस्कोमधलं ब्रिटीश दुतावासाचं कार्यालय रशियाची हानी व्हावी या हेतूने जाणीवपूर्वक कारवाया करत असून आ...

August 18, 2024 1:15 PM

views 27

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज ७ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोवस्क- कामशाकी शहरात ४८ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून तीनशे किलोमीटरच्या भागात त्सुनामी येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिला होता. मात्र नंतर विभागाने ही शक्यता नाकारली.

July 12, 2024 10:33 AM

views 43

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीती निर्माण करणाऱ्या घटना असून जागतिक सुरक्षेसाठी हे आव्हान असल्याचं नाटोनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेत चीनचा निषेध करणारं संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं.

July 10, 2024 1:15 PM

views 25

रशियन सैन्यात मदतनीस असणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी रशियाकडून मान्य

रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची भारताची मागणी रशियानं मान्य केली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा पुतिन यांनी मोदी यांची विनंती तात्काळ मान्य केली. सध्या रशियन सैन्यात ३५ ते ५० भारतीय मदतीस म्हणून काम करतात. तर दहा जण आधीच मायदेशी परतले आहेत.

July 8, 2024 12:59 PM

views 57

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रीया दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. त्याआधी विमानतळावरुन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, भारत आणि रशियामध्ये  गेल्या दहा वर्षात ऊर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि मनुष्यबळ क्षेत्रातली धोरणात्मक भागीदारी वाढली आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री रशियातल्या २२ व्...

July 5, 2024 10:54 AM

views 62

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.   त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणार असून, गेल्या 41 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच या दे...

June 24, 2024 2:51 PM

views 40

रशियात सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर

रशियाच्या उत्तर कॉकेशस प्रांतातल्या डर्बेंट आणि माखाचकाला या शहरांमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर पोहोचली आहे. यात १५ पोलीस अधिकारी,१ धर्मगुरू आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. सहा हल्लेखोर ठार झाले असून इतरांचा शोध सुरू आहे.