डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रशियाचे पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू

रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले. रशियानं केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी दिली. या हल्ल्यांत २३ नागरिक जखमी झाले आहेत.

 

युक्रेनमधील ५५० स्थळांना रशियानं लक्ष्य केलं होतं. यासाठी ३३० रशियन -इराणी बनावटीची शाहेड ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. रशियानं केलेले २७० परतवून लावले आणि तर २०८ ड्रोन नष्ट केल्याची माहिती झेलेन्सकी यांनी दिली. रशियानं केलेल्या हल्ल्यांमुळे राजधानी कीवसह इतर शहरांत मोठं नुकसान झालं आहे. 

 

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध परिस्थिती कोणतीही सुधारणा न झाल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चाही केली.

 

एकीकडे हवाई हल्ले सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही देशांनी आज नव्यानं युद्धकैद्यांची देवाणघेवाण केली. ही देवाणघेवाण इस्तंबूल इथं झालेल्या कराराअंतर्गंत झाली. रशियन संरक्षण मंत्रालयानं देखील युद्धकैदी देवाणघेवाणीच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र किती युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाली याची आकडेवारी दोन्ही देशांनी जाहीर केली नाही.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा