May 29, 2025 10:05 AM

views 14

प्रधानमंत्री आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यांच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. सिक्कीममध्ये, प्रधानमंत्री मोदी आज सकाळी गंगटोकमध्ये 'सिक्कीम@फिफ्टी' या सिक्कीम राज्याच्या राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.   सिक्कीमचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नामची इथं ७५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन...

May 28, 2025 12:36 PM

views 23

एन.टी. रामाराव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली  वाहिली. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम बनवण्यासाठी एन.टी. रामाराव यांनी केलेले प्रयत्न सगळ्यांना प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजामध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

May 27, 2025 3:05 PM

views 18

‘भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी शहरांचा आर्थिक विकास महत्त्वाचा’

भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गांधीनगरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर सन्...

May 27, 2025 1:06 PM

views 25

कोट्यवधी भारतीयांच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताला कोणाहीसोबत शत्रुत्व नकोय, तर शांतता हवी आहे. जगाच्या कल्याणात आपलं योगदान असावं या उद्देशानेच आपण प्रगती करत आहोत. त्यामुळेच आपलं सरकार कोट्यवधी भारतीयांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गांधीनगर इथे गुजरात शहरी विकासाची २० वर्षं पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.    प्रधानमंत्री नरेंद्र मो...

May 26, 2025 1:22 PM

views 33

गुजरातमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन

देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट भारतातच उत्पादित व्हावी ही काळाची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी भारताचे प्रधानमंत्री म्हणून २०१४ मध्ये प्रथम शपथ घेतल्याच्या घटनेला आज ११ वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून गुजरातमध्ये दाहोद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय रेल्वेच्या रेल्वे इंजीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण यावेळी मोदी यांच्या हस्ते झालं.    देशातलं औद्...

May 26, 2025 10:14 AM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या दाहोद इथं 24 हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते दाहोद लोकोमोटिव्ह उत्पादन संयंत्र देशाला समर्पित करणार आहेत. या संयंत्रामुळे पुढील 11 वर्षांत 1 हजार 200 मालगाड्यांच्या इंजिनांची निर्मिती होऊन रेल्वेच्या मालवहन क्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया उद्दिष्टासोबतच जगभरातल्या निर्यातीमुळे मेक फॉर वर्ल्ड उद्दिष्टाचीही पूर्तता होणार आहे.

May 25, 2025 8:02 PM

views 40

‘ऑपरेशन सिंदूर’ हे निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  या कारवाईने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं  मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं. आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यानं केलेल्या पराक्रमानं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ झाली. या कारवाईतली अचूकता अद्भुत असल्याचं ते म्हण...

May 24, 2025 8:02 PM

views 25

प्रत्येक राज्यानं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं ‘किमान एक पर्यटन स्थळ’ विकसित करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं. नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते. 'विकसित भारतासाठी विकसित राज्यं २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे.   भारताचं झपाट्यानं नागरीकरण  होत असून, शहरांच्या प्रगतीसाठीसाठी नवोन्मेष, विकास आणि शाश्वतता आवश्यक आहे, असं प्रधानमं...

May 24, 2025 2:12 PM

views 18

प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण होईल. आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्रसारण होईल.

May 24, 2025 1:57 PM

views 40

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेची बैठक

नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत आहेत. 'विकसित भारतासाठी विकसित राज्ये २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, लेफ्टनंट गव्हर्नर, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशाला विकासाच्या दृष्टीनं भेडसावणाऱ्या समस्या आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्यांची भूमिका याबाबत बैठकीत बहुमत आजमावलं जाण...