डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोट्यवधी भारतीयांच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताला कोणाहीसोबत शत्रुत्व नकोय, तर शांतता हवी आहे. जगाच्या कल्याणात आपलं योगदान असावं या उद्देशानेच आपण प्रगती करत आहोत. त्यामुळेच आपलं सरकार कोट्यवधी भारतीयांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गांधीनगर इथे गुजरात शहरी विकासाची २० वर्षं पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गांधीनगरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या. मोदी यांनी काल वडोदरा, भूज आणि अहमदाबाद इथेही रोड शो केला होता. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा