May 10, 2025 8:45 PM May 10, 2025 8:45 PM

views 23

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांची सहमती

भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी आज दुपारी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज निवेदनात दिली. दरम्यान, भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिक...

May 10, 2025 3:55 PM May 10, 2025 3:55 PM

views 19

पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले

पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की, मुरीद, चक्लाला, रहिमयार खान या ठिकाणची लष्करी केंद्रं, नियंत्रण केंद्रं, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्धवस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली कु...

May 9, 2025 7:14 PM May 9, 2025 7:14 PM

views 14

पाकिस्तानचा ड्रोनच्या सहाय्यानं भारतात ३६ ठिकाणी घुसखोरी करुन हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून काल रात्री पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन करत घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या कृतीला भारतानं चोख उत्तर दिल्याची माहिती परराष्ट्र आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.   पाकिस्ताननं नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करत सुमारे ४०० ड्रोनच्या सहाय्यानं भारतातल्या लेह ते सिरक्रीक दरम्यान ३६ ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्या...

May 8, 2025 8:26 PM May 8, 2025 8:26 PM

views 13

भारतीय हल्ल्यात पाकिस्तानची संरक्षण प्रणाली नष्ट

भारतीय संरक्षण दलानं आज सकाळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. यात लाहोर इथली संरक्षण प्रणाली नष्ट झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.    पाकिस्ताननं भारतातल्या  श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जलंधर, लुधियाना, भटिंडा, चंडीगड, भुज या भागात काल रात्री क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. हे हल्ले भारताच्या हवाई दलानं परतवून लावले. पाकिस्तानं नियंत्रण रेषेवर पूँछ, बारामुल्ला, कुपवाडा या भागात हल्ल...

May 4, 2025 3:01 PM May 4, 2025 3:01 PM

views 13

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या X अकाऊंटवर भारतात बंदी

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या एक्स अकाऊंटवर आज भारताने बंदी घातली. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे.    राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं. या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे. यानंतर सीमा सुरक्षा दलाने श्रीगंगानगर भागात सुरक्ष...

May 3, 2025 12:38 PM May 3, 2025 12:38 PM

views 11

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताची पाकिस्तानकडून आयात बंद

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

April 24, 2025 7:59 PM April 24, 2025 7:59 PM

views 13

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिलेला आहे त्यांचा व्हिसा २७ एप्रिलला रद्द केला जाईल. तसंच वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलला रद्द होईल.  व्हिसा रद्द होण्याच्या अंतिम दिवसाच्या आधी पाकिस्तानी नागरिकांनी भारत  सोडावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकानी पाकिस्तानात जाऊ नये तसंच जे नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी लवकरात लवकर परत यावं ...

April 3, 2025 8:24 PM April 3, 2025 8:24 PM

views 15

अफगाणिस्तानी नागरिकांविरोधात पाकिस्तानची कठोर पावलं

अफगाणिस्तानी नागरिकांनी पाकिस्तान सोडून जाण्याची मुदत संपल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानचं ओळखपत्र असणाऱ्या हजारो नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना छावण्यांमधे हवलण्यात आलं आहे. अंमलबजावणी संस्थांनी अफगाणी नागरिकांना परत पाठवायची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, अफगाणीस्तान सरकारने नागरिकांना परत पाठवायची प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती पाकिस्तानला केली आहे. 

March 31, 2025 6:41 PM March 31, 2025 6:41 PM

views 12

पाकिस्तानमध्ये अफगाण नागरिक कार्डधारकांना देश सोडण्याची आज अंतिम मुदत

पाकिस्तानमध्ये अफगाण नागरिक कार्डधारकांना देश सोडण्याची सरकारने दिलेली अंतिम मुदत आज संपत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या कायदा अंमलबजावणी संस्थांना हजारो अफगाणी निर्वासितांना अटक करून त्यांना परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी पोलीस प्रमुखांनी रावल, पोतोहर आणि सदर या जिल्ह्यांमधे राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या अफगाणी निर्वासितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

March 17, 2025 9:56 AM March 17, 2025 9:56 AM

views 11

बलुचिस्तानात झालेल्या हल्ल्यात ९० पाकिस्तानी ठार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात काल झालेल्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. नोशकी भागात महामार्ग क्रमांक 40वरुन फ्रंटिअर काँस्टबुलरी गटाचे सुरक्षा कर्मचारी बसनं प्रवास करत असताना हा हल्ला झाला. बलुचिस्तान मुक्ती सेनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.