डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाकिस्तानचा ड्रोनच्या सहाय्यानं भारतात ३६ ठिकाणी घुसखोरी करुन हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून काल रात्री पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन करत घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या कृतीला भारतानं चोख उत्तर दिल्याची माहिती परराष्ट्र आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.

 

पाकिस्ताननं नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करत सुमारे ४०० ड्रोनच्या सहाय्यानं भारतातल्या लेह ते सिरक्रीक दरम्यान ३६ ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सोफिया कुरेश यांनी दिली. पाकिस्ताननं केलेल्या या कृतीला भारतानं चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ल्यांचा कट उधळून लावला. पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन भारतानं चार ड्रोनच्या मदतीनं नष्ट केले. पाकिस्तानच्या ड्रोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता हे ड्रोन तुर्की बनावटीचे असल्याचं स्पष्ट झाल्याचं व्योमिका सिंग यांनी सांगितलं. ड्रोन हल्ल्यांबरोबरच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं जोरदार गोळीबार सुरू केला.

 

या गोळीबारात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले. भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सिंग यांनी दिली. कालचे हवाई हल्ले आपण केले नसून हा भारताचा कांगावा असल्याचा दावा पाकिस्ताननं केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. काल जे काही घडलं त्याला भारतानं जबाबदारी सांभाळत चोख उत्तर दिलं असून या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत देणार असल्याचंही मिसरी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा