July 19, 2025 7:16 PM July 19, 2025 7:16 PM

views 8

पाकिस्तान पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ जणांचा मृत्यू, ४६२ हून अधिकजण जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ पेक्षा जास्तजणांचा मृत्यू झाला तर ४६२ हून जास्त लोक जखमी झाले. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १० जणांचा बळी गेला. आपत्तीग्रस्त भागात सरकारचा कोणाही प्रतिनिधी पोहोचलेला नाही, तसंच आपत्तीग्रस्तांना कोणतीही मदत मिळालेली नाही. निवारा शिबिरांमधे कोणत्याही सुविधा नाहीत, त्यामुळे आपत्तीग्रस्तांनी तिथे आसरा घेतलेला नाही, असं वृत्त प्रसारमाध्यमांमधे आलं आहे.

July 18, 2025 8:16 PM July 18, 2025 8:16 PM

views 19

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे ६३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्याने नुल्ला लेह मधे अचानक पूर उद्भवला आहे. गेल्या २ दिवसात वीज अंगावर कोसळून किंवा पावसामुळे बांधकाम कोसळून ४४ जण दगावले. बलुचिस्तानमधेही अतिवृष्टीमुळे १६ जणांचा मृत्यू झाला.

July 11, 2025 12:44 PM July 11, 2025 12:44 PM

views 9

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात नऊ प्रवाश्यांची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात काल संध्याकाळी अज्ञात  बंदूकधारींनी नऊ बस प्रवाश्यांची गोळ्या घालून  हत्या केली.  हे प्रवासी पूर्व पंजाब प्रांतातून येत असल्याची ओळख पटवून बस मधून त्यांचं  अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.   अदयाप कोणत्याही दहशतवादी गटाने या घटनेची जबाबदारी  स्वीकारली नसली तरी,  बलुच लिबरेशन आर्मी बंडखोरांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

July 5, 2025 3:08 PM July 5, 2025 3:08 PM

views 5

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे केलं बंद

तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे बंद केलं आहे. जागतिक पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. क्लाऊड-आधारित आणि भागीदारी तत्वावरील मॉडेल असं बदल तसंच जागतिक पातळीवर ९ हजार नोकऱ्यांची कपातीमुळे झालेला व्यापक कर्मचारी तुटवडा आदी कारणं देत कंपनीनं या निर्णयाची घोषणा केली.   पाकिस्तानमधले मायक्रोसॉफ्टचे माजी प्रमुख जवाद रहमान यांनी बंदच्या या घोषणेला दुजोरा दिला. पाकिस्तानातली आर्थिक स्थिती, राजकीय अस्थिरता, उच्च कर, चलन...

May 24, 2025 2:36 PM May 24, 2025 2:36 PM

views 8

भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर टीका

भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.   पाकिस्ताननं दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्या...

May 22, 2025 2:49 PM May 22, 2025 2:49 PM

views 24

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन

पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं असून त्यांना २४ तासाच्या आत पाकिस्तान सोडायलाही सांगण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी म्हटलं आहे. या आधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला २४ तासाच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले होते.

May 20, 2025 1:23 PM May 20, 2025 1:23 PM

views 19

अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीचं वाटप करण्यात आलं. या मदतीबद्दल अफगाणीस्ताननं भारताचे आभार मानले असून इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

May 19, 2025 2:37 PM May 19, 2025 2:37 PM

views 12

अब्दुल्ला जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू

बलुचिस्तानच्या किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यात जब्बार मार्केटजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. स्फोटानंतर फ्रंटिअर कोअर आणि अज्ञात बंदूकधाऱ्यांमध्ये चकमकही झाली. सुरक्षादलांनी या भागात नाकेबंदी करून शोधमोहीम राबवली.

May 15, 2025 7:44 PM May 15, 2025 7:44 PM

views 8

भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतर कुणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नसल्याची परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत आणि पाकिस्तानदरम्यान इतर कोणाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जय शंकर यांनी केलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच होईल , ती देखील काश्मीरमधे पाकिस्तानने केलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरच असं त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात भारताच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही आणि या मुद्यावर कायम देशभरात सहमती आहे असं ते म्हणाले.   पाकिस्तानने दहशतवाद्यांचे आसरे ...

May 13, 2025 1:22 PM May 13, 2025 1:22 PM

views 13

गोळीबार न करण्यावर भारत-पाकिस्तानमध्ये सहमती

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सैनिकी कारवाई महासंचालक स्तरावर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सैन्याकडून बंदूकीची एकही गोळी झाडली जाता कामा नये, तसंच एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये यावर सहमती झाल्याचं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सीमेवर सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यालाही दोन्ही देशांच्या लष्करानं संमती दर्शवली आहे. दरम्यान सीमावर्ती भागात एवढ्यात शत्रूचे कोणतेही ड्रोन आढळल्याची माहिती नाही. परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे, असं भारतीय ...