October 19, 2025 10:13 AM

views 40

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांची तत्काळ युद्धबंदीवर सहमती

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी काल ही घोषणा केली. कतारची राजधानी दोहा इथं, कतार आणि तुर्किएच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा करार करण्यात आला. या वाटाघाटींदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली असल्याचं कतारच्या परराष्...

October 10, 2025 1:35 PM

views 46

पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव

काबुलमध्ये काल झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला तणाव वाढला आहे. या स्फोटांमुळे पूर्व काबुलमध्ये सरकारी कार्यालयं तसंच निवासी भागात घबराट पसरली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांच्या सभेनंतर काही तासांत ही घटना घडली. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही.

October 7, 2025 3:15 PM

views 83

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आज रेल्वे रुळावर झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. या स्फोटामुळे गाडीचे पाच डबे रुळावरून घसरले.  सिंध प्रांतात शिकारपूर जिल्ह्यात सोमरवाह इथं हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे.

September 30, 2025 7:33 PM

views 30

पाकिस्तानात झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी

पाकिस्तानमध्ये, क्वेटा फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी एफसी मुख्यालयाबाहेर आज झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये दीर्घ काळापासून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ सारख्या गटांचा हिंसाचार सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी क्वेट्टा इथं एका राजकीय रॅलीमध्ये  झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

September 24, 2025 1:39 PM

views 27

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका

पाकिस्तान भारताविरुद्ध निराधार आणि प्रक्षोभक निवेदनं देऊन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या ६० व्या अधिवेशनात जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी राजदूत क्षितीज त्यागी यांनी,  पाकिस्ताननं भारतीय भूभाग बळकावण्याऐवजी तो खाली करून  मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला या अवस्थेतून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करावं अशा शब्दात सुनावलं. दहशतवाद्...

September 22, 2025 10:27 AM

views 33

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

September 15, 2025 10:19 AM

views 46

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.   ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित करत असून पेहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं  कर्णधार सुर्यकुमार य...

September 11, 2025 2:28 PM

views 38

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानचा नकार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.   पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल, त्यामुळे हा सामना रद्द करावा अशी याचिका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर तातडीने सुनावणी घ्यायला आज न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठाने...

August 12, 2025 9:08 AM

views 15

पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून निषेध

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं आधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरूच ठेवेल असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

August 10, 2025 2:39 PM

views 18

भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान

पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्रकारची बंदी घातली असून भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षा यापुढे कोणतंही नुकसान मोठं असू शकत नाही, असं भारतानं म्हटलं आहे.