डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे केलं बंद

तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातलं कामकाज २५ वर्षांनंतर अधिकृतपणे बंद केलं आहे. जागतिक पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. क्लाऊड-आधारित आणि भागीदारी तत्वावरील मॉडेल असं बदल तसंच जागतिक पातळीवर ९ हजार नोकऱ्यांची कपातीमुळे झालेला व्यापक कर्मचारी तुटवडा आदी कारणं देत कंपनीनं या निर्णयाची घोषणा केली.

 

पाकिस्तानमधले मायक्रोसॉफ्टचे माजी प्रमुख जवाद रहमान यांनी बंदच्या या घोषणेला दुजोरा दिला. पाकिस्तानातली आर्थिक स्थिती, राजकीय अस्थिरता, उच्च कर, चलनासंबंधीचे मुद्दे आणि व्यापारी प्रतिबंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.

 

७ मार्च २००० रोजी पाकिस्तानात सुरू झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची पाकिस्तानच्या डिजिटल विकासात महत्त्वाची भूमिका होती.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा