April 25, 2025 10:06 AM April 25, 2025 10:06 AM
10
पहलगाम दहशतवादा विरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने सीसीएसने केलेल्या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व संभाव्य कृतींनाही आपला पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासनही सर्व विरोधी पक्षांनी सरकारला दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं काल नवी दिल्ली इथे संसद भवन संकुलात बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी पहलगाम इथल्या घटनेची आणि त्या विरोधा...