May 28, 2025 1:11 PM May 28, 2025 1:11 PM

views 11

पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

पहलगाममधल्या  दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या  २६ पर्यटकांच्या स्मरणार्थ  पहलगाम इथं स्मारक उभारण्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. पहलगाम इथं काल   झालेल्या जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, जम्मू-काश्मीर सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकाचं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

May 20, 2025 9:59 AM May 20, 2025 9:59 AM

views 12

पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली. असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याचा नेदरलँडनं तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईला दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी नेदरलँडसचं कौतुक केलं.

May 16, 2025 9:28 AM May 16, 2025 9:28 AM

views 1

अफगाणिस्तानकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र व्यवहारमंत्री मावलवी आमिर खान मुताकी यांच्याबरोबर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी अफगाणिस्तानला धन्यवाद दिले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खोटे आणि तथ्यहीन अहवाल प्रसिद्ध करत उभय देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या काही देशांच्या प्रयत्नांचा जयशंकर यांनी दृढपणे निषेध केला.

May 15, 2025 4:12 PM May 15, 2025 4:12 PM

views 11

भारतीय प्रतिनिधी मंडळाने घेतली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळानं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी व्‍लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि नतालिया घेरमन यांनी सुरक्षा परिषदेचा दहशतवाद विरोधी प्रस्ताव आणि संयुक्त राष्ट्रांचं जागतिक दहशतवाद विरोधी धोरण लागू करण्यात सहकार्य वाढवण्यावर भर दिला.    भारताच्या प्रतिनिधी मंडळानं यावेळी दहशतवादी गट आणि त्यांच्याश...

May 6, 2025 7:21 PM May 6, 2025 7:21 PM

views 1

देशात २४४ ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव होणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशात २४४ ठिकाणी उद्या मॉक ड्रिल म्हणजे युद्ध सज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रिय गृह मंत्रालयानं दिले आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणांमधे मुंबई, उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे. त्याखेरीज ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार आहे.   केंद्रीय गृह...

May 4, 2025 2:39 PM May 4, 2025 2:39 PM

views 1

जर्मनीमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा

जर्मनीच्या बव्हेरियातल्या भारतीय समुदायानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल म्युनिकमध्ये शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. सुमारे ७०० लोकांनी या मोर्चात भाग घेतला. जर्मन संसद सदस्य हान्स थेइस आणि म्युनिक सिटी कौन्सिलर डेलिजा बालिदेमाज यांनीही मोर्चात भाग घेतला.

April 28, 2025 8:47 PM April 28, 2025 8:47 PM

views 7

J&K Assembly : पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव अधिवेशनात मंजूर

पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव आज जम्मू - काश्मीर विधानसभेने विशेष अधिवेशनात मंजूर केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विनंतीवरुन नायब राज्यपालांनी हे अधिवेशन बोलावलं होतं. हा अतिशय क्रूर, निर्घृण, अमानुष आणि भ्याड हल्ला काश्मीरियतवर, तसंच संविधानाच्या एकता, शांती आणि सलोख्याच्या तत्वांवर झाला असल्याचं या ठरावात नमूद केलं आहे.   हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रति वचनबद्धता व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. पर्यटकांचा जीव वाचवताना  मरण पावलेल्या सय्...

April 28, 2025 3:03 PM April 28, 2025 3:03 PM

views 2

पहलगाम हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलं आहे. हे सर्वजण पर्यटक आणि वैद्यकीय व्हिजावर आले होते. यापैकी ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांना परतण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयानेही त्या भागात तात्पुरत्या व्हिजावर राहात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवायचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.   असे १७ पाकिस्तानी नागरिक उल्हासनगर भागात राहात असून त्यां...

April 25, 2025 8:15 PM April 25, 2025 8:15 PM

views 1

पाकिस्तानविरोधात उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा

पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते राहुल गांधी  यांनी आज केला.  त्या आधी त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. दहशतवादाचा कणा मोडून टाकण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती  सर्व मदत करण्याचं आश्वासन गांधी यांनी दिलं. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांनी  विचारपूस केली. 

April 25, 2025 3:36 PM April 25, 2025 3:36 PM

views 1

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय शेअर बाजाराकडून १ कोटी रुपयांची मदत

पहलगाम दहशदवादी हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय शेअर बाजारानं १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करायची तयारी असल्याचं NSE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले.