April 25, 2025 2:29 PM April 25, 2025 2:29 PM

views 4

भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.   त्यामुळे भारतातील नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली विमानं पाकिस्तानच्या  हवाई क्षेत्राचा वापर करू शकणार नाहीत. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडची एअर इंडियाची काही उड्डाणं पर्यायी विस्तारित मार्गानं जातील, असं एअर इंडियानं म्हटलं आहे.

April 25, 2025 1:35 PM April 25, 2025 1:35 PM

views 6

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला ६० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्कर - ए - तैय्यबाच्या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसांनी ठेवलं आहे. पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली आहेत.   लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सकाळी श्रीनगरला पोहचले. पहलगाम जवळ बैसरन इथं प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी ते भेट देण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांची  बैठक होईल. हल्लेखोर ...

April 25, 2025 3:30 PM April 25, 2025 3:30 PM

views 5

काश्मीरमध्ये गेलेले महाराष्ट्रातले ८०० पर्यटक सुखरूप परतले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या २ दिवसात महाराष्ट्रातले सुमारे ८०० पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली होती, त्यातून १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले.   आणखी २३२ प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातला कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.    राज्यात परतलेल्या...

April 25, 2025 1:09 PM April 25, 2025 1:09 PM

views 4

दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचा पाठिंबा

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधे भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते.   पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करण्यासाठी केलेल्या कोणत्याही लष्करी कारवाईत ब्रिटनमधले सर्व राजकीय पक्ष भारत सरकारसोबत एकजुटीने उभे राहतील, अशी आशाही ब्लॅकमन यांनी व्यक्त केली. या शोकस...

April 25, 2025 10:49 AM April 25, 2025 10:49 AM

views 9

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रपतींची भेट

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथे भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली. जर्मनी, जपान,पोलंड, युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते.    दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये  काल सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत केंद्र सरकारच्या पाकिस्तान विरुद्धच्या सर्व निर्णयांना पाठिंबा दे...

April 25, 2025 10:13 AM April 25, 2025 10:13 AM

views 11

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला  आहे. ते काल मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. माणुसकीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण भारतासोबत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.    यह हमला केवल पर्यटकों पर नहीं हुआ है, देशके दुश्मनों ने भारत की आत्मा पर प्रहार करने का दुस्साहस किया है। मैं, मोहित, स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूँ किजिन्होंने य...

April 24, 2025 8:26 PM April 24, 2025 8:26 PM

views 8

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटारी वाघा बॉर्डरवरचे दरवाजे बंद

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटारी वाघा बॉर्डरवरचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दररोजचा रिट्रीट समारंभ, तसंच संध्याकाळी राष्ट्रध्वज उतरवल्यानंतरचं पारंपिरक हस्तांदोलनही आज झालं नाही. हा सोहळा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे पर्यटक जमले होते, त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.     

April 24, 2025 8:02 PM April 24, 2025 8:02 PM

views 5

लष्कर ए तैयबाच्या तीन सदस्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्कर ए तैयबा संघटनेच्या तीन सदस्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर  प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसानी ठेवलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक असलेले हाशीम मुसा, अली भाई यांच्यासह जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातला हुसेन ठोकर यांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे.  पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली आहेत.

April 23, 2025 8:28 PM April 23, 2025 8:28 PM

views 14

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू

या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.    मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबा...

April 23, 2025 8:19 PM April 23, 2025 8:19 PM

views 20

पंजाबने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बाजूची सीमा केली बंद

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.   मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्याच्या सीमा पाकिस्तानला आणि काश्मीरला लागून असल्यामुळे राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.