April 29, 2025 3:19 PM April 29, 2025 3:19 PM
15
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची पक्षनेत्यांची मागणी
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी केली आहे. तसं पत्र त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलावण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी या पत्रात केली आहे. काँग्रेसच्या या मागणीवर भाजपाने टीका केली आ...