November 17, 2025 9:27 AM November 17, 2025 9:27 AM
19
लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत
लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या. पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं रंजना प्रकाश देसाई यावेळी म्हणाल्या.