April 23, 2025 8:14 PM

views 22

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 23, 2025 6:24 PM

views 19

देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू – सांस्कृतिक मंत्री

देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आहे असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज  शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाची ३८ वी बैठक झाली.   या बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला. आज झालेल्या बैठकीला विविध भागधारक उपस्थितीत होती. यापूर्वी साध्य केलेलं यश आणि भविष्यातील योजनांची आखणी यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल...

April 10, 2025 1:32 PM

views 36

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु होत आहे. ४० देशातले दीडशेहून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण ४० सत्रे होणार आहेत.   या वर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यामध्ये तांत्रिक आव्हाने आणि संधींवर चर्चा होणार आहे. या संमेलनात मुख्य भाषण, मंत्रीस्तरीय चर्चा, तज्ञ समितीस्तरीय आणि राजकीय स्तरावरील चर्चा होणार आहे.

February 24, 2025 1:40 PM

views 30

प्राप्तिकर विधेयक २०२५चं परीक्षण करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीची बैठक

प्राप्तिकर विधेयक २०२५ चं परीक्षण करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीची बैठक आज नवी दिल्लीत सुरू आहे. ३१ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष भाजपा खासदार बैजयंत पांडा हे आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समिती आपला अहवाल लोकसभेत सादर करेल. प्राप्तिकर विषयक कायद्यात सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.

February 6, 2025 10:35 AM

views 23

माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी नवी दिल्लीत ओपन एआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट

माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुध्दीमत्तेचं लोकशाहीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत असून अल्टमन यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं आहे. असं वैष्णव यांनी सांगितलं. ओपन एआय आधारित तंत्रज्ञानावर आधारित विविध सुविधांचा विकास, एप्सची निर्मिती आणि प्रकल्प तयार करण्याबाबत अल्टमन यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितल...

February 2, 2025 7:27 PM

views 31

नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू

सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं 'हर कंठ में भारत' हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.   आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. ...

January 4, 2025 2:50 PM

views 26

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचे असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत हा नेहमीच संकटकाळी मदत करणारा पहिला देश असून भारतानं मालदीवला कठीण प्रसंगी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल खालिल यांनी आभार मानले. भारताच्या...

January 4, 2025 2:46 PM

views 30

पंतप्रधान मोदी यांनी बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत भेट घेतली. कोनेरू ही क्रीडा क्षेत्रातलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून, उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत आली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. खळेमधली तिची विद्वत्ता आणि आणि निष्ठा ठळकपणे दिसते अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी कोनेरु हंपी हिची प्रशंसा केली आहे.

January 4, 2025 1:43 PM

views 29

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष २०१४ पासून केंद्र सरकार सातत्यानं ग्रामीण भारताच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामीण जनतेला प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात सर्व आवश्यक...

January 2, 2025 2:29 PM

views 31

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरुन किंवा आमंत्रण ॲप वरुन थेट तिकिटं खरेदी करता येतील.