October 23, 2024 1:48 PM October 23, 2024 1:48 PM
14
प्रधानमंत्री आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार
ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झाली नव्हती. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या गस्तीसंबंधाने झालेल्या करारानंतर या देशांमधले संबंध सामान्य होतील अशी आशा संयुक्त र...