January 18, 2025 8:57 PM
23
ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी- प्रधानमंत्री
स्वामित्व योजनेअंतर्गत दिलं जाणारं ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्वामित्व आणि भू आधार या दोन्ही योजना ग्रामीण भारताच्या विकासाचा आधार आहेत, असंही ते म्हणाले. या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजा...