February 21, 2025 9:30 AM February 21, 2025 9:30 AM

views 27

दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार

दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.   दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली असून ती लवकरच लागू करण्यात येईल, असं ही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या पहिल्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगचे १४ अहवाल मांडले जातील अशी माहिती त्यांनी दिली.   तत्पूर्व...

February 14, 2025 3:14 PM February 14, 2025 3:14 PM

views 9

अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन  दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर  भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती.     प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, ...

February 14, 2025 1:25 PM February 14, 2025 1:25 PM

views 37

पुढल्या संकटाचा सामना करण्यासाठी गौतम बुद्धांची शिकवण हाच उपाय- प्रधानमंत्री

संपूर्ण जग आज पर्यावरणापुढल्या संकटाचा सामना करत असून भगवान गौतम बुद्धांची शिकवण हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थायलंड इथं आयोजित संवाद कार्यक्रमाला त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.   भगवान बुद्ध यांचा संयमाचा विचार जागतिक आव्हानाला सामोरं जाताना आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतो, असं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण विषयक संकटामुळे पृथ्वीला धोका उत्पन्न झाला आहे, आपण निसर्गापासून वेगळे नाहीत, असं हिंदू आणि बौद्ध धर्माचा विचार आपल्याला शिकवतो असं ते ...

February 14, 2025 1:17 PM February 14, 2025 1:17 PM

views 20

प्रधानमंत्री अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरण दडपत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  प्रधानमंत्र्यांना देशात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते मौन बाळगतात, आणि परदेशात विचारले जातात तेव्हा ती वैयक्तिक बाब असल्याचं सांगतात. मोदी यांनी अमेरिकेतही अदानींच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातलं आहे, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

February 10, 2025 8:39 PM February 10, 2025 8:39 PM

views 12

प्रधानमंत्र्यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विद्यार्थ्यांशी संवाद नव्या स्वरुपात सादर

विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.    परीक्षेप्रमाणेच जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली. पर्यावरण, कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता.    परीक्षेच्या ताणताणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात प्रधानमंत्री विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. का...

February 7, 2025 8:20 PM February 7, 2025 8:20 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १० तारखेपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली. त्याचबरोबर प्रधानमंत्री या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला अमेरिका दौऱ्यावर जातील. तिथं प्रधानमंत्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.

January 26, 2025 6:55 PM January 26, 2025 6:55 PM

views 4

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक देश म्हणून भारत ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, असं सांगून राज्यघटना तयार करणाऱ्या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं. भारताचा हा प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता या तत्त्वांच्याच आधारावर झालेला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. या निमित्ताने राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक करण्याची आणि एक कणखर आणि समृद्ध भारत घडवण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

January 24, 2025 9:22 AM January 24, 2025 9:22 AM

views 5

 एनसीसीचे छात्र आणी चित्ररथ कलाकारांशी प्रधानमंत्री आज संवाद साधणार

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार आदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. पडद्याच्या मागे असणारे चित्ररथ कलाकार आणि एनसीसी छात्र यांच्याशी पंतप्रधान 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी संवाद साधतील.   यंदा विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे 31 चित्ररथ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची स्वर्णिम भारत – वारसा आणि विकास ...

January 18, 2025 8:57 PM January 18, 2025 8:57 PM

views 11

ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी- प्रधानमंत्री

स्वामित्व योजनेअंतर्गत दिलं जाणारं ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्वामित्व आणि भू आधार या दोन्ही योजना ग्रामीण भारताच्या विकासाचा आधार आहेत, असंही ते म्हणाले.    या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजा...

January 18, 2025 10:38 AM January 18, 2025 10:38 AM

views 10

दिगंतर स्टार्टअपच्या यशाचं प्रधानमंत्र्यांनी केलं कौतुक

देशाच्या संरक्षण क्षेत्र तसंच अवकाश मोहिमांना सहाय्य करण्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या दिगंतर या स्कॉट अभियानातील स्टार्टअपच्या यशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अंतराळास्थितीविषयी जागरुकता वृद्धीच्या दिशेने भारतीय अंतराळ उद्योगाकडून मिळालेले हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटलं आहे.   दुसऱ्या एका संदेशामध्ये प्रधानमंत्र्यांनी पीएम इंटर्नशिप योजनेच्या उत्साहवर्धक परिणामांविषयी समाधान व्यक्त केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारल्यामु...