January 31, 2025 8:14 PM January 31, 2025 8:14 PM

views 17

मुंबई रेल्वे बाॅम्बस्फोट : राज्यसरकारच्या याचिकेवरचा निर्णय उच्च न्यायालयाकडू राखून

मुंबईत जुलै २००६ मधे झालेल्या रेल्वे बाँबस्फोट प्रकरणी १२ आरोपींना ठोठावलेली फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी राज्यसरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. २०१५ मधे कनिष्ठ न्यायालयानं या १२ आरोपींना दोषी ठरवलं, आणि त्यापैकी ५ जणांना फाशी, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षी सुनावली होती.

January 24, 2025 8:57 PM January 24, 2025 8:57 PM

views 9

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी आत्मनिर्भर होईल – मंत्री अमित शाह

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन  शेतकरी आत्मनिर्भर होईल, त्यासाठी शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणं  आवश्यक आहे, असं केंद्रीय गृह  आणि  सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या अजंग इथं झालेल्या सहकार परिषदेत बोलत होते.   केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात साखर कारखाना उद्योगाच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार पाठबळ देत आहे, असं त्यांनी सांगितलं.    अमित शहा यांच्या हस्ते...

January 19, 2025 9:12 AM January 19, 2025 9:12 AM

views 12

मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते.   या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या 3,500 लोकल सेवा कार्यरत आहेत.  ...

January 17, 2025 8:47 PM January 17, 2025 8:47 PM

views 14

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा १९ जानेवारीला सहावा वर्धापन दिन

एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअतंर्गत येणाऱ्या मुंबईतल्या पेडर रोड इथं असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा सहावा वर्धापन दिन येत्या रविवारी, १९ जानेवारीला साजरा केला जात आहे. वर्धापनदिनानिमित्त संग्रहालय आतून पाहण्याची संधी १३ वर्षे आणि त्याखालील मुलांना निःशुल्क मिळणार आहे.    मुलांमधील सृजनशीलता आणि चित्रपटाबद्दलचं कुतुहल वाढवण्याच्या उद्देशानं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. लहान मुलाच्या भावविश्व रेखाटणारा पप्पू की पगडंडी या चित्रपटचा खास शो...

January 6, 2025 9:30 AM January 6, 2025 9:30 AM

views 14

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रण विभागानं तस्करी होत असलेले अमली पदार्थ जप्त केले. यात 74 हजार कॅप्सूल तसंच अडीच लाख बनावट सिगारेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी होत असल्याची माहिती नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्याआधारे विमानतळावर ही कारवाईत करण्यात आली. या प्रकरणी दोन कुरिअर आणि मालवाहतूक कंपन्यांची चौकशी सुरू आहे.

January 5, 2025 1:39 PM January 5, 2025 1:39 PM

views 6

कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४,९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत तसंच स्थावर मालमत्ता बळकावण्यासंदर्भातही  पुरावे सापडले आहेत. बँक ऑफ बडोदाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं दाखल केलेल्या  प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई केली जात...

January 1, 2025 8:01 PM January 1, 2025 8:01 PM

views 12

वायू प्रदूषणाचं प्रमाण नियंत्रणात नाही तोपर्यंत बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम

मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण  पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत  ई विभागातल्या बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार  असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्‍पांची  पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिल्याचं पत्रकात म्हटलं आहे. 

December 31, 2024 8:05 PM December 31, 2024 8:05 PM

views 16

हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या उपाययोजना

मुंबई महानगर क्षेत्रातली हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तातडीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर चर खोदण्याच्या कामाला तात्‍काळ प्रभावानं मनाई करण्‍यात आली आहे. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. पाणी पुरवठ्याच्‍या मुख्य जलवाहिनी गळतीच्या कामकाजाचा अपवाद  वगळता,  नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नाहीत, असं  महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी स्‍पष्‍ट केलं आहे.

December 19, 2024 9:48 AM December 19, 2024 9:48 AM

views 5

भ्रष्टाचार प्रकरणी सीबायची मुंबईतल्या सात अधिकाऱ्यांवर कारवाई

केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सामुहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात २७ स्थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सांगितलं. सीप्झमधलं जागा आरक्षण, आयात मालाचं वितरण आणि अन्य गैरव्यवहारांसाठी मध्यस्थांमार्फत लाच घेतल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. सह विकास आयुक्त, उप विकास आयुक्त आणि दोन सहायक विकास आयुक्तांचा यामध्ये समाव...

December 14, 2024 10:13 AM December 14, 2024 10:13 AM

views 13

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.‘‘हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक ने तो सांस्कृतिक पुन...