March 15, 2025 2:15 PM

views 36

वेव्हज् परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू

वेव्हज् अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू होत आहे. विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्हज् उपलब्ध करून देणार आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्हजचं आयोजन करण्यात आलं आहे.

March 9, 2025 6:48 PM

views 30

मुंबईत पाण्याची टाकी साफ करताना ४ कामगारांचा मृत्यू

मुंबईत नागपाडा मिंट रोड इथं आज निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करत असताना ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एक जण बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाचही कामगारांना बाहेर काढलं आणि जे जे रुग्णालयात दाखल केलं. यातल्या चार कामगारांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. एक जणावर उपचार सुरू आहेत.  

March 6, 2025 8:35 PM

views 38

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतल्या धारावीला आज भेट दिली. धारावी इथं असलेल्या चमार स्टुडिओला भेट देत कारागिरांशी संवाद साधला.    धारावीत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसमावेश उत्पादन साखळीच्या निर्मितीवर भर द्यावा, असा आग्रह राहुल गांधी यांनी केला. चमार स्टुडिओ हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचंही गांधी यांनी सांगितलं.

March 1, 2025 3:48 PM

views 38

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.   विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुविधा अशा विविध बाबींचा आढावा घेतला. विधानभवनात काल झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसंच गृह, सामान्य प्रशासन, महानगरपालिका, वाहतूक, आरोग्य इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

March 1, 2025 1:34 PM

views 31

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

February 25, 2025 3:25 PM

views 29

मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

February 16, 2025 3:43 PM

views 33

मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. धुरामुळे गुदमरून जखमी झालेल्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.

February 14, 2025 7:37 PM

views 38

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागणार !

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असल्याने त्यावर विचार सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

February 14, 2025 3:17 PM

views 31

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त केले. या हिऱ्यांची  तस्करी करणाऱ्या तस्कराला अटक करण्यात आली असून अधिक चौकशीसाठी त्याला विमानतळावरच्या गुप्तचर विभागाकडे सोपवलं आहे.

February 11, 2025 7:42 PM

views 23

मुंबईत मागासवर्गीयांची घरे नियमबाह्य पद्धतीने तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबईत पवईतल्या जयभीम नगर इथली मागासवर्गीयांची घरे नियमबाह्य पद्धतीने तोडणारे अधिकारी आणि बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आहे. गेल्यावर्षी ही घरं पाडताना लहान मुलं, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार या कुटुंबांनी केली होती. त्यानंतर एका पिडीतेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं केलेल्या चौकशीत ही कारवाई नियमबाह्य असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला.