October 28, 2025 3:17 PM October 28, 2025 3:17 PM

views 48

इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री उद्या संबोधित करणार

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरिटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते उपस्थितांशी संवाद साधतील.   सागरी अमृत काल व्हिजन २०४७ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठीची वचनबद्धता दर्शवणारा हा उपक्रम आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदरे, जहाजबांधणी, क्रूझ पर्...

October 25, 2025 8:20 PM October 25, 2025 8:20 PM

views 22

मुंबईचा AQI हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला

मुंबईचा AQI अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे. दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालावला होता. दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसाने धुरके खाली बसून निर्देशांकात सुधार व्हायला मदत झाली.  बहुतांशी ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोचला.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे भातशेतीचं  नुकसान झालं आहे. अरबी समुद्रात वादळी परिस्थती निर्माण झाल्यामुळे बंदरांमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी ज...

October 18, 2025 11:25 AM October 18, 2025 11:25 AM

views 33

डिजिटल अटकेचा बहाणा करून व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक

डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 'डिजिटल अटक' या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे.

October 15, 2025 7:18 PM October 15, 2025 7:18 PM

views 33

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत म्हणजेच ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत पोचण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक पावसाळा थांबल्यानंतरच्या काळात अधिक खराब झाला असून तो गेल्या आठवड्यात १५३ पर्यंत पोचला असल्याचं या अहवा...

October 8, 2025 7:14 PM October 8, 2025 7:14 PM

views 45

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली.   भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले.  स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म्स स्टुडिओलाही आज भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या ३ चित्र...

October 8, 2025 7:29 PM October 8, 2025 7:29 PM

views 139

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.   ८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसे...

October 8, 2025 1:38 PM October 8, 2025 1:38 PM

views 51

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत आगमन झालं. ते  आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांचं समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे स्वागत केलं.    कीर स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. नवी मुंबई आंतरराष्ट...

September 30, 2025 7:43 PM September 30, 2025 7:43 PM

views 25

‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत शिबीर

मुंबईत मालाड इथल्या महानगरपालिकेच्या ‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची तपासणी आणि  लसीकरण करण्यात आलं. तसंच आहारतज्ज्ञांनी  मार्गदर्शन केलं.    शिबिरात सादर केलेल्या जनजागृतीपर नाटकाच्या माध्यमातून मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रतिबंध, क्षयरोग तपासणी, पावसाळ्यातले आजार, जीवनशैली व्यवस्थापन आणि आजाराचं लवकर निदान, याबाबत माहिती देण्यात आली.

September 20, 2025 3:38 PM September 20, 2025 3:38 PM

views 16

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवरच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.   स्वच्छता उपक्रमानंतर एक पेड माँ के नाम या अंतर्गंत एक झाड वायकरांच्या हस्ते लावण्यात आले. मुंबई महापालिकेने घेतलेल्या चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्यांचा वाय...

August 27, 2025 3:44 PM August 27, 2025 3:44 PM

views 17

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं.   चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली, मात्र चर्चा सर्वांसमोर करण्याची अट त्यांनी ठेवली आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज क...