June 12, 2025 7:30 PM

views 22

येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज तर रत्नागिरी जिल्ह्याला उद्या आणि परवा जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, आणि  नागपूर या जिल्ह्यांना उद्या आणि परवासाठी ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी परवा ऑरेंज अलर्ट हवामानविभागाने दिला आहे.

June 11, 2025 8:35 PM

views 32

कोकण, गोवा तसंच दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता

मान्सून साधारणपणे येत्या आठवड्यात सक्रिय होईल. कोकण, गोवा तसंच  दक्षिण भारतात  काही ठिकाणी १२ ते १६ या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवा़डा, छत्तीसगढ, अंदमान निकोबार, तमिळनाडू तसंच पुद्दूचेरी कराईकल आदी भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील तर देशाच्या  वायव्येकडील भागात तसंच पश्चिम हिमालयीन प्रदेशांमध्ये उष्णतेची लाट असेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

June 10, 2025 3:32 PM

views 26

महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक

महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक असल्याचं पोर्तुगालचे राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा, यांनी सांगितलं मुंबईत आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. भारताशी पर्यटन आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई दौऱ्यात आपण शंभराहून अधिक उद्योग प्रतिनिधींना भेटणार असल्याचंही राजदूतांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी बोलताना, पोर्तुगाल आणि भारतादरम्यानचा सध्याचा व्यापार १ अब्ज दोन कोटी डॉलर वरून किमान १० अब...

June 10, 2025 3:13 PM

views 10

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक अधिवेशनात मांडणार

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधी विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात  ६ हजार २५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ, तसंच बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ८ हजार रुपयांची  वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.

June 5, 2025 6:44 PM

views 43

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.   राज्यातले २४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित व...

June 5, 2025 3:16 PM

views 88

आदिशक्ती अभियानासाठी येत्या १५ दिवसात ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश

महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.   या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणे, हुंडा प्रथा थांबवणे, महिलांशी निगडित विविध योजनांबद्दल जनजागृती करणं असा व्यापक उपक्रम राबवला जाणार आहे.

June 4, 2025 7:24 PM

views 30

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवार यांची घेतली भेट

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जपानची भारतात मोठी गुंतवणूक आहे.   रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या जपानी कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.   उद्योग तसंच आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही त्...

June 4, 2025 1:44 PM

views 14

प्रत्येकाला घर देणारं ‘महाराष्ट्र’ देशातलं पहिलं राज्य ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणांर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे इथं प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.   शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याची घरं पूर्ण करत असतान...

June 3, 2025 3:08 PM

views 32

राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला चौकशीचे निर्देश

ठाण्यातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायाची जबरदस्ती झाल्याच्या माध्यमांमधल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आरोपीला पॉक्सो कायद्याखाली त्वरित अटक करावी आणि कृती अहवाल येत्या तीन दिवसात सादर करावा असे निर्देश राज्य पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तसंच पीडित मुलीला मदत देऊन पुनर्वसन करावं असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.   उत्तरप्रदेशात गाझियाबादमध्ये महिलेवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचीही  आयोगाने...

June 3, 2025 3:23 PM

views 30

कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत. हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहे...