महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत. हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या कोविडचे ५०६ रुग्ण उपचार घेत आहेत.
Site Admin | June 3, 2025 3:23 PM | Corona | COVID-19 | Maharashtra
कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी
